मोहोळ यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर, जगदीश मुळीकांची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jagdish Mulik | भारतीय जनता पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहळ यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आलं आहे. भाजपचे सरचिटणीस असलेले मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर भाजपने पुन्हा एकदा पुण्याची जबाबदारी दिली आहे. दरम्यान, पुण्यातून मुरलीधर मोहळ यांच्या बरोेबरच जगदीश मुळीक यांचे देखील लोकसभा निवडणुकीसाठी नाव जोडण्यात आलं होतं. मात्र, जगदीश मुळीक यांच भाजपने  तिकीट कापल्यानंतर सोशल मीडियावर मुळीक यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

पोस्टमध्ये काय म्हटलं?

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील दिग्गज नेत्यांचे बॅनर्स लावले होते. यामध्ये जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले होते. मात्र काल भाजपने लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे पुण्यातून भाजपचे अनेकजण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते.

दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांना तिकीट दिल्यानंतर जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. जगदीश मुळीक यांनी ही पोस्ट फेसबुकवरुन शेेअर केली.

कायम जनेतेच्या सेवेत!

फेसबुकद्वारे जगदीश मुळीक यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “मी जनतेच्या सेवेत कायम असेल!, शिवाय कोणतेही पद नसताना माझ्या साठी जनतेने, कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे, जी मी पूर्ण निष्ठे पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद,” असं जगदीश मुळीक यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फडणवीसांची भेट-

जगदीश मुळीक यांनी राज्यातील भाजपचे बडे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी भेट घेतली असल्याचे सांगण्यात आलं. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. खरं तर पुणे लोकसभेसाठी सुरुवातीपासून मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक हे प्रबळ दावेदार मानले जात होते.

News Title : Jagdish mulik post goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

उशिरा झोपत असाल तर सावधान! शास्त्रज्ञांनी दिला मोठा इशारा

बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार? इंडियन बँकेत भरती प्रक्रिया सुरु

भाजपमुळे अजित पवारांचं टेंशन वाढलं? ; ‘हा’ नेता शरद पवार गटात जाणार?

नाशिकमध्ये उमेदवार राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा?; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा तो साउथ सिनेमा आता या दिवशी OTT वर येतोय?