प्रतिभाताई पाटील यांच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pratibha Patil | भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांना उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुधवारी (13 मार्च) रोजी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले डाॅक्टर?

गेल्या काही दिवसांपासून प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना ताप येत असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. मात्र, रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. सध्या त्यांना उपचारासाठी पुणे येथील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभाताई पाटील यांची तब्येत व्यवस्थित आहे. उपचारांना त्या चांगला प्रतिसाद देत असून, त्यांना पुढील दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल.

त्यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु, त्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांनी ठेवण्यात आलं आहे. पुढील दोन दिवसांत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची अपेक्षा असून त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे.

प्रतिभा पाटील यांची कारकिर्द-

प्रतिभा पाटील भारताच्या 12 व्या राष्ट्रपती आहेत. 89 वर्षांच्या प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांचा राष्ट्रपती पदाचा काळ 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012 दरम्यान राहिला. वयाच्या 27व्या वर्षी त्या पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेल्या होत्या.

News Title : Pratibha Patil health update

महत्त्वाची बातमी-

मोहोळ यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर, जगदीश मुळीकांची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

चालू मेट्रोत घडला धक्कादायक प्रकार, महिला थेट बसली पुरुषाच्या…, पाहा व्हिडीओ

मुंबईने विदर्भाला चारली धूळ; 42 व्या जेतेपदावर कोरलं नाव

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे दर

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागांना यलो अलर्ट