‘टप्पू’सोबतच्या नात्याबाबत बबिताजीचा अखेर मोठा खुलासा!

Munmun Datta | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ता (Munmun Datta) उर्फ बबीताजी आणि राज अनाडकत उर्फ टप्पू यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. अशातच त्यांनी साखरपुडा केल्याचीही जोरदार चर्चा होत होती. यामुळे अनेकांना धक्का बसला होता.

वडोदरामध्ये या दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याचं म्हटलं जात होतं. यावर आता दोघांनीही मौन सोडलं आहे. या चर्चा खोट्या आणि निव्वळ हास्यास्पद असल्याचं मुनमुनने म्हटलं आहे. राजनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहित साखरपुड्याच्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे.

बबिता आणि टप्पूचं स्पष्टीकरण

“एकदम वाईट आणि हास्यास्पद! या व्हायरल बातमीत काहीच तथ्य नाहीये. मी अशा खोट्या बातम्यांवर माझा वेळ आणि शक्ती वाया घालवणार नाही.” असं मुनमुनने म्हटलं आहे. तर, “सोशल मीडियावर व्हायरल होणारी बातमी ही पूर्णपणे खोटी आणि अर्थहीन असून, यावर कोणीही विश्वास ठेऊ नका” असं स्पष्टीकरण राज अनादकटने (Raj Anadkat Aka Tappu) दिलं आहे.

2017 साली अभिनेता भव्य गांधीच्या जागी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये टप्पूच्या भूमिकेसाठी अभिनेता राज अनादकटची वर्णी लागली होती. तर मुनमुन सुरुवातीपासून या मालिकेचा एक भाग आहे. तिला ‘बबिताजी’ म्हणून ओळखलं जातं.

बबिता आणि टप्पूचा संताप

राज आणि मुनमुन (Munmun Datta) यांच्या वयात 9 वर्षांचं अंतर असल्याचं म्हटलं जातं. मुनमुन आणि राज यांच्या रिलेशनच्या चर्चा बऱ्याच महिन्यांपासून होत आहेत. सेटवर त्यांच्यात चांगली मैत्री होऊन त्यांच्यात प्रेमाचे संबंध तयार झाल्याचं म्हटलं गेलं. आता तर थेट त्यांनी साखरपुढा उरकल्याचं म्हटलं गेलं. त्यामुळे चाहत्यांना धक्काच बसला.

यावर दोघांनीही मौन सोडत स्पष्टीकरण देत संताप व्यक्त केला. राजने मालिका सोडल्याने या चर्चा अजूनच वाढल्या होत्या. यावेळी त्याने मालिका सोडण्यामागचं कारणसुद्धा सांगितलं होतं. “हा माझा वैयक्तिक निर्णय होता. त्यात काहीच चुकीचं झालं नाही. एक अभिनेता म्हणून मला पुढे जायचं आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारून मला एक कलाकार म्हणून पुढे जायचं आहे.”, असं उत्तर राजने दिलं होतं.

News Title- Munmun Datta explanation on discussion of relationship with Raj Anadkat

महत्त्वाच्या बातम्या –

Pune News: पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळताच मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया

Pune Lok sabha: पुण्यात जगदीश मुळीक यांचा हिरमोड, आता काय निर्णय घेणार?

भाजपकडून सुजय विखेंची उमेदवारी जाहीर, दुसरीकडे शरद पवारांचा मोठा डाव?

भाजपच्या यादीत पाच महिला, मात्र नवनीत राणांचं टेन्शन वाढलं!

बीडमधून मुंडे कुटुंबाला धक्का, भाजपने घेतला मोठा निर्णय