बापरे! केंद्र सरकारने तब्बल 18 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी; पाहा लिस्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

OTT Platform Ban l भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने OTT प्लॅटफॉर्मवरील अश्लील कंटेंट संदर्भात मोठी कारवाई केली आहे. आज देशभरात 18 OTT प्लॅटफॉर्म, 19 वेबसाइट, 10 मोबाइल ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल ब्लॉक करण्यात आले आहेत.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की बॅन केलेल्या प्लॅटफॉर्मवर अश्लील वेब सीरिज, चित्रपट दाखवले जात होते. यासंदर्भात सरकारने संबंधितांना नोटीस देखील बजावली होती. मात्र, त्यांनी अश्लील सिनेमा, वेबसीरिज हटवले नाहीत. त्यामुळे सरकारने ही कारवाई केली आहे.

OTT Platform Ban l हे OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले :

ड्रीम्स फिल्म्स, नियॉन एक्स वीआईपी, मूड एक्स, वूवी, बेशर्म्स, मोजफ्लिक्स, येस्मा, हंटर्स, हॉट शॉट्स वीआईपी, अनकट अड्डा, रैबिट, फूजी, ट्राई फ्लिक्स, एक्ट्रामूड, चीकूफ्लिक्स, एक्स प्राइम, नियूफ्लिक्स, प्राइम प्ले.

IT ACT, 2000 च्या तरतुदींनुसार कारवाई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या तरतुदींनुसार ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. हे पाऊल उचलण्यापूर्वी, सरकारी मंत्रालये/विभागांनी प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन तज्ञ, महिला हक्कांचे ज्ञान असलेले तज्ञ आणि बाल हक्कांवर काम करणाऱ्यांचा सल्ला घेतला आहे.

OTT Platform Ban l बंदी घालण्यात आलेले App किती आहेत? :

केंद्र सरकारने केलेल्या कारवाईत बंदी घालण्यात आलेल्या एका OTT अॅप्सला तब्बल एक कोटींहून अधिक डाउनलोडर आहेत. याशिवाय दोन अन्य प्लॅटफॉर्ममध्ये Google Play Store वर 50 लाखांपेक्षा अधिक डाउनलोड झाले आहे. तसेच OTT प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया हँडलवर देखील अश्लील ट्रेलर, दृष्य अतिरंजीत पद्धतीने दाखवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आज देण्यात आली आहे.

News Title : 18 OTT Platform Ban List

महत्त्वाच्या बातम्या –

प्रतिभाताई पाटील यांच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!

मोहोळ यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर, जगदीश मुळीकांची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

चालू मेट्रोत घडला धक्कादायक प्रकार, महिला थेट बसली पुरुषाच्या…, पाहा व्हिडीओ

मुंबईने विदर्भाला चारली धूळ; 42 व्या जेतेपदावर कोरलं नाव

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे दर