‘…आता त्याचा निर्णय’; निलेश लंकेंबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) गटातील नेते आणि विद्यमान आमदार निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यातच काल (13 मार्च) भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे आहेत.

भाजपाने अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिल्याने ही जागा भाजपाकडे गेली आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके नाराज झाले आहेत. त्यामुळे लंके लवकरच मविआकडून इथे लढणार असल्याच्या जोरदार चर्चा होत आहेत. त्यामुळे अजित पवारांना चांगलाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अजित पवारांची प्रतिक्रिया

या सर्व चर्चेवरच आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी स्पष्टच उत्तर देऊन टाकलं. अजित पवार सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, “कालच निलेश माझ्याकडे आला होता. मी निलेशसोबत चर्चा केली. त्याला काही गोष्टी समजून सांगितल्या. पण काही लोकांनी त्याच्या मनात हवा घातली आहे की, तू खासदार होशील म्हणून… पण वास्तव तसं नाहीये. निलेश पारनेरपुरता लोकप्रिय आहे. पण बाकीच्या मतदारसंघात त्याला वाटतं तितकं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं, तू तशा पद्धतीने वागू नको. जितकं समजून सांगणं गरजेचं आहे. तितकं मी केलेलं आहे. आता त्याचा निर्णय”, असं यावेळी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

राजकारणमध्ये कुणालाही कुठेही जाता येतं. वास्तविक निलेशला पक्षात मी आणलं. त्याला मनापासून आधार मी दिला. आताही विकासकामांसाठी निलेशला मोठ्या प्रमाणावर मदत मी केलेली आहे, असंदेखील अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

दरम्यान, लंके यांना राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते अमोल कोल्हे यनीही मागे पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे आज ते पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा राजकारणात आहे. निलेश लंके यांच्या पुस्तकाचं आज पुण्यात प्रकाशन होत आहे. याच कार्यक्रमामध्ये ते पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title :  Ajit Pawar on MLA Nilesh Lanke

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपमुळे अजित पवारांचं टेंशन वाढलं? ; ‘हा’ नेता शरद पवार गटात जाणार?

नाशिकमध्ये उमेदवार राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा?; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा तो साउथ सिनेमा आता या दिवशी OTT वर येतोय?

वाहन मालकांनो प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा होईल मोठं नुकसान

लग्नापूर्वी मुलींनी ‘या’ 5 गोष्टी शिकायलाच हव्या!