“त्याची मर्जी, सानिया मिर्झाला ठेवून आणखी चार..”, अभिनेत्रीचं शोएबबद्दल धक्कादायक वक्तव्य

Hira Soomro Shocking Statement About Shoaib Malik

Hira Soomro | पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट देत तिसऱ्यांदा लग्न केलं. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला ‘खुला’ दिल्याचं म्हटलं गेलं. यामुळे शोएबला चांगलंच टार्गेट करण्यात आलं. त्यातच आता एका पाकिस्तानी अभिनेत्रीने (Hira Soomro) शोएबच्या तिसऱ्या लग्नाबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री हिरा सूमरोने शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाचं समर्थन केलं आहे. एका पॉडकास्टमध्ये तिने याबाबत बोलूनच दाखवलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शोएब मलिक आणि त्याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा होत आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नाचा संसार थाटला आहे.

अभिनेत्री हिरा सूमरोचं धक्कादायक वक्तव्य

“मला कळत नाहीये की शोएबने लग्न करून काय चुकीचं केलंय? लोक याबाबत इतका गोंधळ का घालत आहेत?”, असं हिरा सूमरो पॉडकास्ट मध्ये म्हणाली. यावर होस्ट म्हणाला, त्याने भारतीय बायकोला सोडून दिलं, त्यामुळे लोक नाराज आहेत. यावर पुढे हिराने(Hira Soomro) धक्कादायक वक्तव्य केलं.

“यामध्ये सर्व शोएबची मर्जी आहे. सानिया मिर्झाला सोबत ठेवूनही तो आणखी चार लग्न करू शकला असता. मला कळत नाहीये की लोकांना नेमकं कशाचं दुःख होतंय?, त्याने सानियाला सोडलं याचं की सनाशी लग्न केलं याचं?” यानंतर होस्ट लगेच म्हणाला की भारतीय वहिनीला सोडलं याचं लोकांना दुःख वाटत आहे. पाकिस्तानी बायको असती आणि तिला सोडून दुसरी आणली असती तर कदाचित इतकं वाईट वाटलं नसतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by FHM PAKISTAN (@fhmpakistan)

शोएब-सानियाचा घटस्फोट

होस्टच्या या वक्तव्यावरही हिराने उत्तर दिलं. आजकाल कुणाच्या घरात काय घडतंय या सगळ्या गोष्टी दिसून येत नाहीत. कदाचित सानिया शोएबला समजू शकली नसेल. तसंही आताच्या काळात लोक लग्न झाल्यावरही अनेक गर्लफ्रेंड्स करतात. लग्नानंतर गर्लफ्रेंड असण्याला तर कोणतंही बंधन नाही, असं वक्तव्य हिरा सूमरोने (Hira Soomro) केलं आहे.तिच्या या वक्तव्याची आता एकच चर्चा होत आहे.

शोएब मलिकने (Shoaib Malik) आणि सना जावेद यांनी लग्न करत सर्वांनाच धक्का दिला होता. सना जावेदने 2012 मध्ये ‘शेहर-ए-जात’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. यासोबतच तीने अनेक मालिकांमध्येही भूमिका केली. एका शूटदरम्यान त्यांची भेट झाली. नंतर त्यांच्या चांगली मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. त्यांनी जानेवारी 2024 मध्ये लग्न केलं. यामुळे शोएबला भारतासह पाकिस्तानमधूनही टार्गेट करण्यात आलं.

News Title : Hira Soomro Shocking Statement About Shoaib Malik

महत्वाच्या बातम्या- 

बापरे! केंद्र सरकारने तब्बल 18 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी; पाहा लिस्ट

‘टप्पू’सोबतच्या नात्याबाबत बबिताजीचा अखेर मोठा खुलासा!

प्रतिभाताई पाटील यांच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!

मोहोळ यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर, जगदीश मुळीकांची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

चालू मेट्रोत घडला धक्कादायक प्रकार, महिला थेट बसली पुरुषाच्या…, पाहा व्हिडीओ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .