अजित पवारांना पहिला मोठा झटका; निलेश लंकेंनी अजित पवारांचं ऐकलंच नाही

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. पुण्यात पत्रकार परिषदत घेऊन निलेश लंके यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

अजित पवारांना पहिला मोठा झटका

निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, अन्यथा त्यांची आमदारकी जाईल, असा दम अजित पवारांनी लंके (Nilesh Lanke) यांना दिला होता. मात्र, अजित पवारांच्या इशाराला न जुमानता निलेश लंके शरद पवारांच्या गोटात दाखल झाले आहेत.

निलेश लंकेंना नगरमधून उमेदवारी?

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. सुजय विखे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, विखेंविरोधात तगडा उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. सुजय विखेंविरोधात निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी देणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“त्याची मर्जी, सानिया मिर्झाला ठेवून आणखी चार..”, अभिनेत्रीचं शोएबबद्दल धक्कादायक वक्तव्य

‘…आता त्याचा निर्णय’; निलेश लंकेंबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

आता वजन कमी करणं झालं सोपं, फक्त आठवड्यातून एकदाच…

‘तू बधिर झालेला मंत्री…’; मनोज जरांगे पाटील फडणवीसांवर पुन्हा भडकले

पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर होताच प्रीतम मुंडेंचा मेसेज व्हायरल, म्हणाल्या…