‘सुप्रीम कोर्टात शरद पवार यांचा सन्मान; माझी छाती अभिमानाने फुलली’, आव्हाड झाले भावूक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jitendra Awhad | पक्ष आणि घड्याळ चिन्हावर शरद पवार आणि अजित पवार या दोघांना आपला दावा सांगितला. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिलं. त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर न्यायाधीशांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे. आधी स्वत:ची ओळख निर्माण करा, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांचे कान टोचले आहेत. दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार यांचं कौतुक केल्यानं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. (Jitendra Awhad)

सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांचं कौतुक करत अभिमानास्पद वक्तव्य केलं आहे. ते ऐकून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली असून त्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

आव्हाड यांचं ट्वीट

“सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी न्यायदान करण्याच्या आसनावर बसलेले असताना आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबद्दल जी टीप्पणी केली आहे ती छाती फुगवणारी होती. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, शरद पवार हे खूप मोठ्या उंचीचे नेते आहेत. सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या न्यायाधीशाने न्यायासनावर बसून अशी टीप्पणी कोणाबद्दल केली असेल, असे मला तरी आठवत नाही. सर्वोच्च न्यायालयाला जे कळले ते ज्या बालकांना हाताला धरून शरद पवार साहेबांनी चालवले; त्यांना समजले नाही, हे दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या टीप्पणीने माझे मात्र उर भरून आले”. अशी पोस्ट आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे.

शरद पवार यांच्या पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर न्यायमूर्ती विश्वनाथन आणि सूर्याकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी केली आहे. या सुनावणीमध्ये अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाऐवजी दुसरं चिन्ह देण्याबाबत सुचवलं.

चिन्ह आणि पक्षावरून दोन्ही गटाच्या वकिलांनी मांडली मतं

शरद पवार गटाचे वकील अभिषेक सिंघवी यांनी छगन भुजबळांच्या विधानाचा दाखला दिला आहे. ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळ चिन्हांचा वापर केला जात आहे, असं सिंघवी यांनी वाचून दाखवलं आहे.

यावर कोर्टाने अजित पवार गटाला सांगितलं की तसं असेल तर तुम्ही तुमचे फोटो वापरावेत. त्यावर अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह म्हणाले की आम्ही फोटो वापरत नाही, तसं काही असेल तर काही उत्साही कार्यकर्त्यांनी केलं आहे.

News Title – Jitendra Awhad Share Post About Sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या  

“आतापर्यंत मी तुमचं ऐकत आलो आता माझं तुम्हाला ऐकावं लागेल”

अजित पवारांना पहिला मोठा झटका; निलेश लंकेंनी अजित पवारांचं ऐकलंच नाही

“त्याची मर्जी, सानिया मिर्झाला ठेवून आणखी चार..”, अभिनेत्रीचं शोएबबद्दल धक्कादायक वक्तव्य

‘…आता त्याचा निर्णय’; निलेश लंकेंबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

आता वजन कमी करणं झालं सोपं, फक्त आठवड्यातून एकदाच…