सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना झापलं, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit pawar Vs Sharad pawar । आगामी लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांचा असल्याचा दावा अजित पवार यांनी केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिला होता. याविरोधात शरद पवार यांनी अजित पवार (Ajit pawar Vs Sharad pawar) यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांना सुनावले आहे.

शरद पवार यांच्या नावाचा आणि फोटोचा राजकीय गैरवापर केल्यानं अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने सुनावलं आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उत्तर मागितलं आहे.

काही महिन्याआधी शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात (Ajit pawar Vs Sharad pawar) सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये शरद पवार यांच्या फोटोचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर केला जात असल्याचं याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता काका आणि पुतण्यामध्ये वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावलं

सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी केली. या सदर याचिकेवर खंडपीठाने अजित पवार गटाला सुनावलं आहे. अजित पवार गटाने शरद पवार (Ajit pawar Vs Sharad pawar) यांच्या छायाचित्राचा राजकीय गैरवापर केला आहे, यावर अजित पवार गटाने शनिवारपर्यंत उत्तर द्यावं, यावर येत्या शनिवारी अजित पवार गट काय उत्तर देईल हे पाहणं गरजेचं आहे. (Ajit pawar Vs Sharad pawar)

खरा राष्ट्रवादी पक्ष म्हणून अजित पवार यांना निवडणूक आयोगानं 6 फेब्रुवारीला मान्यता दिली आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टामध्य़े धाव घेतली. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव सध्यातरी असेल, असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. 7 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आतापर्यंत कायम राहिल, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

तुमची ओळख निर्माण करा

न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, आता वेगळ्या राजकीय पक्षात आहात तर त्यांचं छायाचित्र का वापरावे? तुमची ओळख घेऊन जनतेसमोर जा. तुम्ही त्यांच्यासोबत न राहता निर्णय घेतला आहे. निवडणुका आल्या की तुम्हाला त्यांची नावे लागतात. जेव्हा निवडणूक नसते तेव्हा तुम्हाला त्यांची गरज लागत नाही, असे म्हणत अजित पवार गटाला खडेबोल सुनावले आहेत.

News Title – Ajit pawar Vs Sharad pawar Supreme Court Announcement

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! केंद्र सरकारने तब्बल 18 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी; पाहा लिस्ट

‘टप्पू’सोबतच्या नात्याबाबत बबिताजीचा अखेर मोठा खुलासा!

प्रतिभाताई पाटील यांच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!

मोहोळ यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर, जगदीश मुळीकांची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

चालू मेट्रोत घडला धक्कादायक प्रकार, महिला थेट बसली पुरुषाच्या…, पाहा व्हिडीओ