काँग्रेस सोडणार?, प्रणिती शिंदेंचा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Praniti Shinde | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता लवकरच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. यावरच प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या प्राणिती शिंदे?

मी सोलापूर जिल्ह्यामधील विरोधी पक्षाची एकमेव आमदार आहे. इथे बाकी सर्व भाजपाचे आमदार आहेत .भाजपचे आमदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत नाहीत. मग, अशात तुमची बाजू कोण मांडणार, जनतेची बाजू कोण घेणार? भाजपचे आमदार हुकूमशाही सरकारला घाबरतात, असं त्यांनी म्हटलंय.

लोकांची बाजू विधानसभेत मांडायला मग इथे राहिलं कोण? माझ्या नावाने या सर्व अफवा पसरवल्या जात आहेत. मी भाजपमध्ये जाणार या सर्व अफवा आहेत. पण, मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या रक्तात काँग्रेस आहे. मी सर्वधर्मसमभाव या संकल्पनेवर विश्वास ठेवते, असं स्पष्टपणे प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या आहेत.

पुढे त्यांनी म्हटलं की, मी ईडीला घाबरणारी नाही. माझ्याकडे कारखाना नाहीये. माझ्याकडे संस्था देखील नाहीत. त्यामुळे भाजप विरोधात बोलणार. मला कशाची भीती नाहीये, त्यामुळे मी भाजपत जाणार नाही, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.

सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर?

दरम्यान, सुशीलकुमार शिंदे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चेवर त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपाचे काही नेते मला आणि प्रणितीला भाजपामध्ये या म्हणून सांगत होते. पण ते कसं शक्य आहे. आम्ही ज्या आईच्या कुशीत वाढलो, जिथे आमचे बालपण गेले, तिथे आम्ही दुसऱ्यांशी घरोबा कसा करणार?, आता मी 83 वर्षांचा झालोय. आता हे शक्य नाही.”, असं सुशीलकुमार म्हणाले आहेत.

सुशीलकुमार शिंदे अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन सोहळ्या तबोलत होते. त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पाणी फेरलं आहे. तसंच प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी देखील आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

News Title : Praniti Shinde explanation on the talk of joining BJP

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपनं सुधीर मुनगंटीवरांना बळंच बसवलं घोड्यावर!, इच्छा नसताना होणार का खासदार?

आजपासून खरमास सुरू, पुढील 30 दिवस चुकूनही शुभ कार्य करू नये

उशिरा झोपत असाल तर सावधान! शास्त्रज्ञांनी दिला मोठा इशारा

बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार? इंडियन बँकेत भरती प्रक्रिया सुरु

भाजपमुळे अजित पवारांचं टेंशन वाढलं? ; ‘हा’ नेता शरद पवार गटात जाणार?