Gas Cylinder | लोकसभा निवडणूक जवळ येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करताना दिसत आहेत. आज (15 मार्च) ला सकाळीच पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकारणात विरोधी पक्ष नेत्यांनी मोदी सराकरवर जोरदार टिका केल्याचं चित्र पहायला मिळालं. दरम्यान, आता सर्वसामान्यांसाठी योगी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत आनंदाची बातमी दिली. पुढील 10 दिवस मोफत एलपीजी सिलेंडर देणार असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे योजना?
उत्तर प्रदेश येथील योगी सरकार सर्वसामन्यांना सणादिवशी मोफत गॅस सिलेंडर (Gas Cylinder) वाटप करत असतात. दरम्यान, होळी सण जवळ आला असून या वेळी देखील मोफत गॅस सिलेंडर वाटप करणार असल्याचं योगी सरकारने सांगितलं आहे. राज्यातील जवळपास 1.75 कोटी पात्र कुटुंबांना मोफत एलपीजी सिलेंडर दिले जाणार आहेत.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत (PM Ujjwala Yojana) मोफत गॅस सिलेंडरचं वाटप केलं जाणार आहे. योगी सरकारच्या योजनेनुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षातून दोनवेळा मोठ्या सणांच्या दिवशी मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. याआधी योगी सरकारने दिवाळीच्या दिवशी मोफत एलपीजी सिलेंडरचं वाटप केलं होतं.
योजनेचा कसा लाभ घेणार?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, सर्वात आधी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचं बँक खातं आधारशी लिंक करावं लागेल. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही उज्ज्वला (Gas Cylinder) योजना सुरु करण्यात आली होती. उत्तर प्रदेश सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 2023-24 या वर्षासाठी 2,312 कोटी रुपयांचे बजेट ठरवलं आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 1.75 कोटी गरीब महिलांना दरवर्षी दोन मोफत गॅस सिलेंडर रिफिल केले जाणार आहेत.
गॅस रिफील केले-
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना गॅस देखील रिफील करुन दिले होते. शिवाय या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 80.30 लाख महिलांना सिलेंडर रिफील करुन दिले होते. तर दुसऱ्या टप्प्यात 50.87 लाख महिलांना गॅस सिलेंडर रिफील करुन मिळाले आहेत. योगी सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण 1.31 कोटी हून अधिक गॅस सिलेंडर देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 10 नोव्हेंबर 2023 ला ही योजना सुरु करताना लाभार्थी महिलांच्या खात्यात अनुदानाची रक्कम खात्यात जमा केली आहे.
News Title : gas cylinder to give free because of holi
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी?; बड्या नेत्याने श्रीकांत शिंदेंना सुनावलं
टप्पू-बबिताच्या साखरपुड्याच्या चर्चेदरम्यान TMKOC टीमच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
‘कमी वयात मला कळलं होतं’; अभिनेत्री सारा अली खानचा मोठा खुलासा
अजित पवारांच्या दोन वक्तव्याने राजकारणामध्ये खळबळ!
‘तुम्ही शूद्र मनाचे माणूस…’, शरद पोंक्षेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत