Sara Ali Khan | अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांनी 1991 साली लग्न केलं.मात्र, लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांचा संसार मोडला. त्यांना सारा आणि इब्राहीम ही दोन मुले आहेत. सैफने नंतर अभिनेत्री करीना कपूर सोबत लग्न करत दुसऱ्यांदा संसार थाटला.
सारा अली खान ही बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सारा आणि इब्राहीम अनेकदा करीना आणि सैफ सोबत दिसून येतात. नुकतंच सारा वडील सैफ आणि सावत्र आई करीना सोबत जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सोबत दिसून आली होती. आता तिने एक मोठं वक्तव्य करत मनातली खदखद बोलून दाखवली आहे.
सारा आपली आई अमृता सिंह सोबत राहते. सिंगल मदरसोबत राहणं खूप वेगळं असल्याचं तिने बोलून दाखवलं आहे.एका मुलाखतीमध्ये साराने वडील सोबत नसल्याची खंत बोलून दाखवली आहे. खासगी आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना केला असल्याचं साराने म्हटलं आहे.
“सिंगल मदरसोबत राहणं सर्वात..”
मुलाखतीमध्ये साराला (Sara Ali Khan ) ‘तुझ्या आयुष्यात सशक्त महिलांचा प्रभाव काय आहे?’, असा सवाल करण्यात आला. यावर ती म्हणाली की, मला असं वाटतं सिंगल मदरसोबत राहणं सर्वात महत्वाची भूमिका आहे. फार कमी वयात मला कळलं होतं, की कोणी तुमच्यासाठी काहीही करणार नाही.
View this post on Instagram
असं नाही की मला मदत मिळाली नाही. मला मदत मिळाली, पण अखेर तुम्हीच तुमच्या आयुष्याचे संचालक असता. स्वतःहून काही गोष्टी घडून येतील असा विचार तुम्ही करत असाल तर, असं काहीही होत नाही. हा भ्रम असतो. असं वक्तव्य साराने केलं आहे.
सारा ‘या’ सिनेमात झळकणार
दरम्यान, सारा (Sara Ali Khan ) लवकरच ‘ए वतन मेरे वतन ‘ सिनेमात दिसून येणार आहे.यासोबतच ‘मर्डर मुबारक’ मध्ये देखील ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.सध्या सारा तिच्या दोन्ही आगामी सिनेमांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशन दरम्यान तिने आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे.
News Title- Sara Ali Khan big revelation
महत्त्वाच्या बातम्या –
“ब्रीजभूषण यांच्याविरोधात आवाज उठवल्यापासूनच मला…”, विनेश फोगाट संतापली
मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया
“भाजपची गॅरंटी चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक”
“त्यांनी एकदा स्पष्टच करावं की…”, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, सरकारची घोषणा