अजित पवारांच्या दोन वक्तव्याने राजकारणामध्ये खळबळ!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit pawar | राज्याच्या राजकारणामध्ये मोठ मोठे ट्वीस्ट निर्माण होऊ लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख अजूनही समोर आली नाही. अशातच राजकारणामध्ये नवनवीन घटना घडताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे बारामतीमध्ये जात सभा घेत आहेत. आपली पत्नी सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी मतदारांना भावनिक साद घालताना दिसत आहेत. मात्र आता त्यांनी एका सभेमध्ये दोन वक्तव्य केली आहेत. त्यामध्ये मोदी आणि अमित शहा यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे आता राज्याच्या राजकाऱणामध्ये ट्वीस्ट निर्माण होऊ शकतो.

अजित पवार (Ajit pawar) हे सध्या सभा घेताना दिसत आहेत. बारामती मतदारसंघामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीआधी ते विविध वक्तव्य करत आहेत. अजित पवार (Ajit pawar) हे आता मोदी आणि शहा यांच्यासोबत असण्यामागे काहीना काही कारण असावं. मोदी आणि शहा यांची अजित पवार यांच्यावर असलेली कृपा ही अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यातून दिसते. म्हणून अजित पवार हे शरद पवार यांना सोडून भाजपकडे  गेले असल्याचं तर्क वितर्क लावले जात आहेत.

“एका व्यक्तीला मोक्का लागणार होता, पण मी”

अजित पवार (Ajit pawar) हे एका सभेमध्ये मतदारांना संबोधित करत होते. त्यावेळी अजित पवार यांनी एका व्यक्तीला मोक्का लागणार होता, पण मी तो मोक्का लागू दिला नाही. आता इथून पुढं माझ्याकडं यायचं नाही असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यानंतर एका साखर कारखान्यावरूनही त्यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे.

“नरेंद्र मोदी यांच्यामुळे ते व्याज माफ झालं”

साखर कारखान्यावर इनकम टॅक्सची टांगती तलवार होती. गेली 25 वर्षांचं व्याज असून ते व्याज 10 हजार कोटी होतं. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळे ते व्याज माफ झालं असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.

अजित पवार हे आपले काका शरद पवार यांना सोडून भाजपसोबत आले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये मोदी आणि शहांचा उदो उदो केला. त्यांच्या एका कारखान्यावर तब्बल 25 वर्षांआधीपासून 10 हजार कोटी एवढं व्याज होते ते व्याज मोदी आणि अमित शहा यांच्यामुळे माफ झालं, असं अजित पवार म्हणाले.

मोदी आणि शहा यांचा उल्लेख अजित पवार यांनी केला आहे. त्यांनीच 25 वर्षांचं व्याज माफ केलं आहे, असं अजित पवार म्हणाले, म्हणूनच आता अजित पवार शरद पवार यांना सोडून भाजपसोबत आले आहेत, असा अनेकांना वाटतं आहे.

News Title – Ajit pawar Big Statement About Modi-Shah

महत्त्वाच्या बातम्या

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज; होईल फायदाच फायदा

अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी समोर

“फारच कंटाळा आला तर भजन करायचं….”, पुतण्याचा काकांना पुन्हा सल्ला

‘बिग बी यांच्यावर 90 कोटींचं कर्ज, शिवाय मालमत्ताही जप्त’, जया बच्चन यांचा गौप्यस्फोट

7 तास थांबवून ठेवलं, नंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवतारेंना समज, म्हणाले…