अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी समोर

Amitabh Bachchan | बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब खासगी तसेच प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, आता अमिताभ बच्चन यांना सकाळी मुंबई येथील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण बच्चन कुटुंब अनंत आंबानीच्या प्री वेडिंग शूटला उपस्थित होते. मात्र, अचानाक अमिताभ बच्चन यांना सकाळी कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं  वातावरण निर्माण झालं आहे.

काय आहे प्रकरण?

आज (15 मार्च) रोजी सकाळी 6 वाजता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कडक सुरक्षेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बिग बींवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या शस्त्रक्रियेची माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

वयाच्या 81 व्या बिग बी यांच्या शस्त्रक्रिया झाल्यामुळे चाहते चिंतेत आहेत. पण त्यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. हार्ट ब्लॉकेजनंतर अमिताभ बच्चन यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन यांनी केलं ट्विट-

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी स्वतः याबदल आपल्या अधिकृत X अकाउंटवरुन चाहत्यांना माहिती दिली आहे. सगळी सध्या फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरु आहे. बिग बी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘कायम कृतज्ञ…’ बिग बींच्या ट्विटवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रेम व्यक्त करत आहेत.

News Title : Amitabh Bachchan health update

महत्त्वाच्या बातम्या-

“फारच कंटाळा आला तर भजन करायचं….”, पुतण्याचा काकांना पुन्हा सल्ला

‘बिग बी यांच्यावर 90 कोटींचं कर्ज, शिवाय मालमत्ताही जप्त’, जया बच्चन यांचा गौप्यस्फोट

7 तास थांबवून ठेवलं, नंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवतारेंना समज, म्हणाले…

अजित पवारांना धक्का?, लंकेंनंतर ‘हा’ बडा नेता शरद पवारांकडे परतणार?

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये हजारो जागांसाठी भरती सुरु; या तारखेपर्यंत अर्ज करता येणार