अजित पवारांना धक्का?, लंकेंनंतर ‘हा’ बडा नेता शरद पवारांकडे परतणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप समोर आली नाही. लोकसभा निवडणुकीची तारीख कधी समोर येईल हे सांगता येणार नाही. अशातच आता अजित पवार गटाला मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे. एका बाजूला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पाऊल उचललं आहे. अजित पवार आपल्या मतदारसंघामध्ये जात मतदारांना भावनिक आवाहन करत आहेत. तर अशा स्थितीमध्ये अजित पवार गटातून काही नेते शरद पवारांसोबत (Sharad Pawar) जाताना दिसत आहेत.

अजित पवार यांचे विश्वासू पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी आपल्या गाडीवरील घड्याळ चिन्ह काढून तुतारी चिन्ह लावले आहे. अशातच आता निलेश लंके यांच्यानंतर अजित पवार गटातील नेता शरद पवार यांच्याकडे येणार असल्याच्या चर्चा आहे.

अजित पवार गटाचे नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील हे शरद पवार गटामध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेण्यासाठी मुंबईमध्ये जाणार आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक या मुंबईच्या निवासस्थानी जात भेट घेणार आहेत.

जळगावचे रहिवाशी आणि अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ते लवकरच शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर जाणार असून त्यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. त्यांना रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी रवींद्र पाटील यांना संधी द्यायची आहे, अशी चर्चा आहे. यामुळे एकनाथ खडसेऐवजी रवींद्र पाटील यांना लोकसभेचं तिकीट मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

शरद पवार गटाकडून ऑफर

शरद पवार गटाकडून ऑफर आल्याची माहिती स्वत: रवींद्र पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यामुळे रवींद्र नाना पाटील हे शरद पवार यांच्या भेटी दरम्यान काय चर्चा करतील, हे भेटीनंतर समोर येईल.

सासू-सून लढत टळणार?

एका बाजूला रावेर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे लढणार आहेत. त्यांच्याविरोधात सासरे एकनाथ खडसे लढणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आता रवींद्र नाना पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे सासरे आणि सून यांच्यात होणारी लढत टळू शकते.

रावेर मतदारसंघातून आता भाजपकडून रक्षा खडसे लढणार आहेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यांच्याविरोधात रवींद्र नाना पाटील यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले तर चुरशीची लढत होईल. जर रवींद्र नाना पाटील अजित पवार गटाला सोडून शरद पवार गटामध्ये आल्यास, शरद पवार गटाला बळकटी प्राप्त होईल.

News Title – Sharad Pawar Big News Update

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा!

अवघ्या काही तासात सुरु होणार WPL एलिमिनेटर सामना; कुठे व किती वाजता पाहता येणार

नववर्षात होंडा कंपनी ग्राहकांना देणार मोठा धक्का; 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल

राजकारणात खळबळ! 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल

अनेक संघाना घाम फुटणार; दिल्ली कॅपिटल्समध्ये 29 चेंडूत शतक झळकावणाऱ्या खेळाडूची एन्ट्री