अनेक संघाना घाम फुटणार; दिल्ली कॅपिटल्समध्ये 29 चेंडूत शतक झळकावणाऱ्या खेळाडूची एन्ट्री

Jake Fraser-McGurk IPL 2024 l आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे. हा सामना 23 मार्च रोजी चंदीगड येथे होणार आहे. अशातच आता दिल्लीला IPL पूर्वीच एक मोठा धक्का बसला आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू लुंगी एनगिडी या मोसमातून बाहेर पडला आहे. एनगिडी हा जबरदस्त गोलंदाजांपैकी एक आहे. अशातच आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेक फ्रेझर मॅकगर्कचा संघात समावेश करण्यात आला आहे. 29 चेंडूत शतक झळकावून फ्रेझर प्रसिद्धीच्या झोतात आला होता. फ्रेझरने अनेकवेळा जबरदस्त कामगिरी केली आहे.

Jake Fraser-McGurk IPL 2024 l दिल्ली कॅपिटल्सकडून जेक फ्रेझर मॅकगर्कला मिळाले ‘तब्बल’ इतके रुपये :

आयपीएलने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित बातम्या शेअर केल्या आहेत. दिल्लीने लुंगी एनगिडीच्या जागी अष्टपैलू जेक फ्रेझर मॅकगर्कचा आयपीएल 2024 साठी संघात समावेश केला आहे. जेकने ऑस्ट्रेलियाकडून 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 50 लाख रुपये देऊन संघात समाविष्ट केले आहे. मात्र ही त्याची राखीव किंमत होती. देशांतर्गत सामन्यांमध्ये जेकचा रेकॉर्ड चांगला आहे.

फ्रेझर मॅकगर्कने 29 चेंडूत शतक झळकावले :

Jake Fraser-McGurk IPL 2024 l फ्रेझर मॅकगर्कने ऑस्ट्रेलियाकडून 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने 16 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 550 धावा केल्या आहेत. तसेच फ्रेझर मॅकगर्कने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. फ्रेझर मॅकगर्कने लिस्ट ए मध्ये 21 सामने खेळले आहेत. या कालावधीत 525 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे.

फ्रेझर मॅकगर्कने द मार्श कपमध्ये 29 चेंडूत शतक झळकावून प्रकाशझोतात आला आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या सामन्यात त्याने 38 चेंडूंचा सामना करत 125 धावा केल्या. या काळात 10 चौकार आणि 13 षटकार मारले. हा सामना तस्मानिया विरुद्ध ऑक्टोबर 2023 मध्ये पार पडला आहे.

News Title : Jake Fraser-McGurk IPL 2024

महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटप्रेमींना IPL फुकटात कुठे पाहता येणार? जाणून घ्या पहिल्या सामन्याबद्दलची A टू Z माहिती

लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा!

व्हॉट्सॲप DP चा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केल्यास येणार अलर्ट मेसेज

“ब्रीजभूषण यांच्याविरोधात आवाज उठवल्यापासूनच मला…”, विनेश फोगाट संतापली

मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया