क्रिकेटप्रेमींना IPL फुकटात कुठे पाहता येणार? जाणून घ्या पहिल्या सामन्याबद्दलची A टू Z माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Watch Online l आयपीएल 2024 च्या हंगामाला 22 मार्चपासून सुरवात होत आहे. या मोसमातील पहिला सामना महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे चेन्नईत आमनेसामने येणार आहेत. चेन्नई हा संघ गेल्या मोसमाचा विजेता संघ आहे. तसेच चाहत्यांना या आयपीएलचा संपूर्ण हंगाम विनामूल्य पाहता येणार आहे.

IPL 2024 Watch Online l प्रेक्षकांना मोफत IPL सामने कुठे पाहता येणार? :

प्रेक्षकांना आयपीएल 2024 चे संपूर्ण सामने Jio सिनेमावर पाहता येणार आहेत. जिओ सिनेमाने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या मोसमातील पहिला सामना धोनी आणि कोहली यांच्यात होणार आहे. त्यामुळे उत्साह द्विगुणित होईल. त्यामुळे 22 तारखेला आरसीबी आणि सीएसके पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत.

जर तुम्हाला आयपीएल टीव्हीवर बघायची असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर या वाहिनीवर पाहू शकता. आयपीएलचे समालोचन हे हिंदी, इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये होणार आहे. गेल्या वेळी जिओ सिनेमाने चाहत्यांना भोजपुरी, तामिळ आणि तेलगू भाषेत कॉमेंट्रीचा पर्याय दिला होता. तसेच या मोसमातही हेच सुरू राहणार आहे. चाहत्यांना सामान्य स्क्रीनवर तसेच एचडीमध्येही आयपीएलचा आनंद घेता येणार आहे.

IPL 2024 Watch Online l CSK Vs RCB मध्ये होणार लढत :

देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये 22 मार्च रोजी CSK आणि RCB यांच्यात पहिला सामना होणार आहे. यानंतर दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. हा सामना 23 मार्च रोजी चंदीगड येथे होणार आहे. मोसमातील तिसरा सामना KKR आणि SRH यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकातामध्ये होणार आहे.

News Title : IPL 2024 Watch Online

महत्त्वाच्या बातम्या –

लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा!

व्हॉट्सॲप DP चा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केल्यास येणार अलर्ट मेसेज

“ब्रीजभूषण यांच्याविरोधात आवाज उठवल्यापासूनच मला…”, विनेश फोगाट संतापली

मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया

“भाजपची गॅरंटी चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक”