“जेव्हा एखादा पुरुष..”, अमिताभ यांच्याबद्दल जया बच्चन यांचा मोठा खुलासा

Jaya Bachchan | अभिनेत्री जया बच्चन आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. त्यांच्या लग्नाला आता जवळपास 50 वर्ष झाली आहे. त्यांनी 3 जून 1973 साली लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या एवढ्या वर्षांनी जया बच्चन यांनी अमिताभ यांच्या कठीण काळातील एक किस्सा सांगितला आहे.

नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी हजेरी लावली होती. यातच त्यांनी विविध मुद्द्यांवर मोकळेपणे गप्पा मारल्या. त्याचसोबत जया बच्चन यांनी कुटुंबातील काही किस्सेसुद्धा सांगितले आहेत. जया बच्चन या पहिल्यांदाच पती अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी बोलल्या.

साधारण 1990 चा तो काळ असेल, जेव्हा अमिताभ यांच्यावर मोठं संकट आलं होतं. या काळात त्यांची कंपनी चांगलीच डबघाईला आली होती. तेव्हा बिग बींच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. जवळपास 90 कोटींचं कर्ज त्यात सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

जया बच्चन यांचा मोठा खुलासा

बऱ्याचदा या काळात कर्जाची परतफेड मागण्यासाठी घरासमोर दररोज लोक यायचे. ते सर्व अत्यंत अपमानास्पद आणि लाजिरवाणं असल्याचं स्वतः अमिताभ बच्चन यांनी बोलून दाखवलं होतं. या कठीण प्रसंगी यश चोप्रा यांनी अमिताभ यांची मदत केली होती.

यश चोप्रा यांनी त्यांना ‘मोहब्बतें’मधील भूमिकेची ऑफर दिली आणि अमिताभ यांची गाडी पुन्हा वळणावर आली होती. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमुळे देखील त्यांना बरीच मदत झाली होती. याच कठीण काळाबद्दल जया बच्चन (Jaya Bachchan)या व्यक्त झाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ यांचा ‘तो’ कठीण काळ

“आम्ही आयुष्याच्या विविध टप्प्यांवर अनेक अपयशांना सामोरं गेलो. जेव्हा एखादा पुरुष कठीण काळातून जात असतो, तेव्हा त्यांच्यासोबत फक्त शांतपणे उभं राहावं. तुमचं सोबत असणंच खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्या बाजूने शांत उभं राहून आपण फक्त इतकंच म्हणायचं असतं की मी तुमच्यासोबत आहे.”, असं जया बच्चन (Jaya Bachchan) पॉडकास्टमध्ये म्हणाल्या.

मात्र, जया बच्चन यांच्या या विधानाला लेक श्वेता बच्चनने विरोध केला. कधी कधी पुरुषांना कल्पनांची गरज असते. तर कठीण काळात शांत उभं राहण्यापेक्षा सक्रिय होऊन मला त्यांची मदत करायला आवडेल.असं लगेच श्वेता बच्चन म्हणाली. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

News Title- Jaya Bachchan big revelation about Amitabh Bachchan

महत्त्वाच्या बातम्या –

व्हॉट्सॲप DP चा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केल्यास येणार अलर्ट मेसेज

“ब्रीजभूषण यांच्याविरोधात आवाज उठवल्यापासूनच मला…”, विनेश फोगाट संतापली

मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया

“भाजपची गॅरंटी चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक”

“त्यांनी एकदा स्पष्टच करावं की…”, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका