लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pankaja Munde | राज्याच्या राजकारणामध्ये ट्वीस्ट निर्माण होताना दिसत आहेत. भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आलं आहे. त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपले बंधुराज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांच्याबाबत त्यांना प्रश्न विचारला. धनंजय मुंडे यांना विधानसभेमध्ये साथ द्याल का? यावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उत्तर दिलंय.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

गेल्या काही वर्षांपासून परळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात लढत झाली होती. मात्र आता राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये युती झाल्याने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना विधानसभेसाठी साथ देणार का? असा प्रश्न केला, त्यावर पंकजा मुंडे उत्तरल्या आणि म्हणाल्या की लोकसभेला जसं ते काम करतील तसं विधानसभेमध्ये काम केलं जाईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

मनापासून एकत्र आहेत का?

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे जरी भाऊ बहिण असले तरीही त्यांच्यामध्ये आधीपासून राजकीय वाद आहेत. त्यांनी याआधी एकमेकांविरोधात टीका केल्या होत्या. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने दोघांनी आपल्यातलं वैर संपवलं असल्याची चर्चा आहे. पण दोन्ही नेते एकमेकांसोबत मनापासून एकत्र आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.

धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष एकत्रित आला आहे. त्यामुळे नैसर्गिकदृष्ट्या ते आम्ही एकत्र आलो आहे. जेवढ्या मतांनी प्रीतम ताईंना निवडून दिलं होतं, त्याहून अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं योगदान नक्कीच असेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

“जास्त मतांनी निवडून येऊ”

आता अजित पवार आणि भाजप यांच्यामध्ये युती झाल्याने ताकद वाढेल. त्यामुळे अधिक मतांनी निवडून येऊ, अशी आशा आहे. आम्ही जिल्ह्याची निवडणूक लढलो तेव्हा परिस्थिती वेगळी होती, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात विधानसभेमध्ये लढत झाली होती. त्यावेळी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे विजयी झाले होते. यामुळे आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्याने परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेसोबत आल्याने परळीतून त्रास होणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाले होते.

News Title – Pankaja Munde Will Help to Dhananjay Munde For Parali Election

महत्त्वाच्या बातम्या

टप्पू नव्हे तर बबिताजी ‘या’ अभिनेत्यासोबत होती रिलेशनमध्ये?; स्वतःच केला खुलासा!

‘सुप्रीम कोर्टात शरद पवार यांचा सन्मान; माझी छाती अभिमानाने फुलली’, आव्हाड झाले भावूक

वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना झापलं, म्हणाले…

काँग्रेस सोडणार?, प्रणिती शिंदेंचा मोठा खुलासा