अवघ्या काही तासात सुरु होणार WPL एलिमिनेटर सामना; कुठे व किती वाजता पाहता येणार

MI Vs RCB, WPL 2024 Eliminator Live Streaming l महिला प्रीमियर लीग 2024 चा एलिमिनेटर सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यातील विजयी संघ रविवारी अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.

एलिमिनेटर सामना अतिशय रोमांचक होण्याची शक्यता :

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्ससमोर 190 धावांचे विक्रमी लक्ष्य गाठून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. मात्र हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील आरसीबीने एमआयविरुद्ध तीन गडी गमावून 113 धावांचे लक्ष्य गाठले होते.

MI Vs RCB, WPL 2024 Eliminator Live Streaming l मुंबई आणि आरसीबी यांच्यातील एलिमिनेटर सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. मुंबईला त्यांच्या मागील पराभवाचा बदला घ्यायचा आहे तर आरसीबी प्रथमच डब्ल्यूपीएल फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही एलिमिनेटर सामन्याचे टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कधी, कुठे आणि कसे पाहू शकता हे जाणून घेऊयात…

MI Vs RCB, WPL 2024 Eliminator Live Streaming l एलिमिनेटर सामन्याची संपूर्ण माहिती :

MI विरुद्ध RCB यांच्यातील एलिमिनेटर सामना कधी खेळला जाईल? :

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना आज म्हणजेच शुक्रवार, 15 मार्च रोजी होणार आहे.

MI vs RCB यांच्यातील एलिमिनेटर सामना कोठे खेळवला जाईल? :

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

MI vs RCB यांच्यातील एलिमिनेटर सामना किती वाजता सुरू होईल? :

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील एलिमिनेटर सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता होईल.

MI vs RCB मधील एलिमिनेटर सामना कोणत्या चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाईल? :

स्पोर्ट्स 18 चॅनलवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील एलिमिनेटर सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता.

MI vs RCB यांच्यातील एलिमिनेटर सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता? :

तुम्ही जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील एलिमिनेटर सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

News Title : MI Vs RCB, WPL 2024 Eliminator Live Streaming

महत्त्वाच्या बातम्या –

नववर्षात होंडा कंपनी ग्राहकांना देणार मोठा धक्का; 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल

राजकारणात खळबळ! 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल

अनेक संघाना घाम फुटणार; दिल्ली कॅपिटल्समध्ये 29 चेंडूत शतक झळकावणाऱ्या खेळाडूची एन्ट्री

“जेव्हा एखादा पुरुष..”, अमिताभ यांच्याबद्दल जया बच्चन यांचा मोठा खुलासा

क्रिकेटप्रेमींना IPL फुकटात कुठे पाहता येणार? जाणून घ्या पहिल्या सामन्याबद्दलची A टू Z माहिती