नववर्षात होंडा कंपनी ग्राहकांना देणार मोठा धक्का; 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Honda Cars Price Hike l कार लव्हर्स नववर्षात नवीन कार खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र आता एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. Honda Cars India एप्रिल 2024 पासून आपल्या मॉडेल लाइनअपच्या किमती वाढवणार आहे, याआधी देखील कंपनीने जानेवारीमध्ये किमती वाढवल्या होत्या.अशातच आता कंपनी एलिवेट, सिटी आणि अमेझ या तिन्ही मॉडेल्सच्या किमती वाढवणार असल्याचे दिसत आहे.

Honda Cars Price Hike l होंडा कंपनी ग्राहकांना खास ऑफर देणार :

Honda Amaze ही कंपनीच्या सध्याच्या लाइनअपमध्ये सर्वात परवडणारी कार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 7.16 लाख रुपये आहे, तर Elevate ची किंमत 11.58 लाख रुपयांपासून सुरू होते. Honda City च्या बेस व्हेरियंटची किंमत 11.71 लाख रुपये आहे, तर City e:HEV हायब्रिड व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 18.89 लाख रुपये आहे.

Honda Cars कंपनी कारच्या किमती किती वाढवणार आहे याचा खुलासा अद्याप केलेला नाही. मात्र, पुढील महिन्यात यासंदर्भातील माहिती समोर येणार आहे. तसेच कंपनी आकर्षक डीलसह ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने होंडा मार्च 2024 मध्ये काही खास ऑफर देण्याच्या तयारीत आहे. या ऑफरमध्ये Elevate वर 50,000 पर्यंत सूट तसेच Amaze वर 90,000 पर्यंतची सूटचे फायदे समाविष्ट करण्यात येणार आहेत. तसेच होंडा सिटी 1.20 लाखांपर्यंतच्या बचतीसह सवलतीच्या बाबतीत आघाडीवर आहे.

Honda Cars Price Hike l Honda च्या किमती वाढणार :

Honda Cars India ने या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या नुकत्याच लाँच केलेल्या Elevate कॉम्पॅक्ट SUV च्या किमती 58,000 रुपयांनी वाढवल्या होत्या. Honda Elevate ची गेल्या वर्षी लाँच झाल्यापासूनची ही पहिलीच किंमत वाढ होती, त्यानंतर त्याची सुरुवातीची किंमत 11.58 लाख आणि टॉप-स्पेक ड्युअल-टोन व्हेरियंटसाठी 16.48 लाख एक्स-शोरूम होती.

याशिवाय पर्ल व्हाइट कलर पर्यायासाठी ग्राहकांना 8,000 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. नवीन वर्षात किमतीत वाढ होऊनही त्याच्या विक्रीत कोणताही फरक पडलेला नाही आणि 20,000 युनिट्सच्या विक्रीचा टप्पा पार केला आहे.

News Title : Honda Cars Price Hike

महत्त्वाच्या बातम्या –

अनेक संघाना घाम फुटणार; दिल्ली कॅपिटल्समध्ये 29 चेंडूत शतक झळकावणाऱ्या खेळाडूची एन्ट्री

“जेव्हा एखादा पुरुष..”, अमिताभ यांच्याबद्दल जया बच्चन यांचा मोठा खुलासा

क्रिकेटप्रेमींना IPL फुकटात कुठे पाहता येणार? जाणून घ्या पहिल्या सामन्याबद्दलची A टू Z माहिती

लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा!

व्हॉट्सॲप DP चा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केल्यास येणार अलर्ट मेसेज