‘बिग बी यांच्यावर 90 कोटींचं कर्ज, शिवाय मालमत्ताही जप्त’, जया बच्चन यांचा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jaya Bachchan | बाॅलिवूडमधील कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असणारं बच्चन कुटुंब सोशल मीडियावर चांगलं सक्रिय असतं. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन पापाराझीसमोर अनेक वेळा दिसत असतात. बच्चन कुटुंब त्यांच्या खासगी आयुष्यापासून ते प्रोफेशन आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. दरम्यान, जया अमिताभ बच्चन यांची नात आर्थातच श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदाने पाॅडकास्ट सुरु केलं आहे. या पॉडकास्ट मुलाखतीत ती तिच्या कुटुंबीयांना आमंत्रित करते आणि त्यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर गप्पा मारते. दरम्यान, यामध्ये जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्या कठीण काळाबदल नवा खुलासा केला आहे.

काय म्हणाल्या जया बच्चन?

पाॅडकास्टमध्ये बोलत असताना जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी बिग बी यांच्या आयुष्यातला कठीण प्रसंग सांगितलं. 1990 मध्ये अमिताभ बच्चन यांची कंपनी काही कारणामुळे दिवाळखोरीत गेली होती. आणि या वेळी अमिताभ बच्चन यांच्यावर फार मोठं कर्ज होतं. जवळपास 90 कोटींचं कर्ज होतं आणि त्यामुळे सर्व मालमत्ता जप्त झाली होती. कर्जाची परतफेड मागण्यासाठी घरासमोर दररोज लोक यायचे. ते सर्व अत्यंत अपमानास्पद आणि लाजिरवाणं होतं”.

मात्र, यश चोप्रा यांनी जेव्हा अमिताभ बच्चन यांना मोहब्बते या चित्रपटातली भूमीका दिली त्यानंतर बिग बी यांचं करिअर नव्याने सुरु झालं, असं जया बच्चन म्हणाल्या. त्याचसोबत त्यांच्या यशात ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा मोलाचा वाटा आहे.

पाॅडकास्टमधील किस्से –

व्हाॅट द हेल या पाॅडकास्टमधील सिझन 2 च्या भागात बच्चन (Jaya Bachchan) कुटुंबातील अनेक सदस्यांना आमंत्रीत करण्यात येत असतं. दरम्यान, या वेळी जया बच्चन यांना आमंत्रित केलं असता त्यांनी बच्चन कुटुंबातील काही किस्सेसुद्धा सांगितले आहेत.

बच्चन कुटुंबातील वाद-

गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबात वाद असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, अनंत आंबानी प्रीवेडींग शुट दरम्यान, संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्रीत असल्याचं बघून या चर्चांना पूर्णविराम मिळाला. शिवाय जया बच्चन यांच्या स्वभावामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, दुसरीकडे अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये दुरावा आला नसून हे कपल एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहत असल्याचं देखील समोर आलं.

News Title : jaya bachchan reveals the truth

महत्त्वाच्या बातम्या –

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये हजारो जागांसाठी भरती सुरु; या तारखेपर्यंत अर्ज करता येणार

अभिनेता कार्तिक आर्यनने खरेदी केली नवी कार; किंमत वाचून थक्क व्हाल

वैवाहिक जीवनात सुख शांती हवी असल्यास आमलकी एकादशीला या गोष्टी करा; जाणून घ्या शुभ मुहूर्त

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा!

अवघ्या काही तासात सुरु होणार WPL एलिमिनेटर सामना; कुठे व किती वाजता पाहता येणार