“फारच कंटाळा आला तर भजन करायचं….”, पुतण्याचा काकांना पुन्हा सल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख कधी लागेल हे सांगता येत नाही. बारामती मतदारसंघाकडे राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. यंदा बारामती मतदारसंघामध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे. एका बाजूला शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे लढणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता ते जवळ पास निश्चित झालं असल्याचं पाहायला मिळत आहे. (Ajit Pawar)

दोन्ही गट बारामतीमध्ये दौरे करताना दिसत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी याच पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. आतापर्यंत मी तुमचं ऐकत आलो, आता माझं तुम्हाला ऐकावं लागेल. जर विकास करायचा असेल तर आपल्यातला खासदार हवाय, असं म्हणत अजित पवार यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे.

शरद पवार यांना कोपरखळ्या

उतारवायामध्ये लोकांनी आशीर्वाद देण्याचं काम करायचं असतं. काही चुकलं तर कान धरायचा असतो. फारच कंटाळा आला तर भजन करायचं असतं, अशी मिश्कील टीका अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केली. सध्या खूप जनांचे फोन येत आहेत. भावनिक केलं जात आहे. भावनिक व्हायचं की विकास कामांच्या मागे उभे राहायचं हे तुम्ही ठरवायचं, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

“तालुक्याचा विकास की, विकासकामांना खीळ?”

त्यानंतर ते म्हणाले की तालुक्याचा विकास करावा की, तालुक्यांच्या विकासकामांना खीळ निर्माण करावी हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे.

गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांचे रथ फिरत होते. तर सुनेत्रा पवार यांची बॅनरबाजी देखील करण्यात येत आहे. तर शरद पवार हे ग्रामीण भाग पिंजून काढताना दिसत आहेत.

सध्या घड्याळ आणि तुतारी अशी लढत होताना दिसत आहे. अनेकांना घड्याळ हे चिन्ह परिचित आहे. तुतारी हे पक्षचिन्ह अनेकांना माहित नसल्याच बोललं जात आहे. यामुळे शरद पवार गावो गावी जात आपल्या तुतारी चिन्हाबाबत माहिती देत आहेत.

News Title – Ajit Pawar tount to Sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या

“ब्रीजभूषण यांच्याविरोधात आवाज उठवल्यापासूनच मला…”, विनेश फोगाट संतापली

मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया

“भाजपची गॅरंटी चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक”

“त्यांनी एकदा स्पष्टच करावं की…”, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, सरकारची घोषणा