HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज; होईल फायदाच फायदा

HDFC Bank FD RATE l तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते. HDFC बँकेने त्यांच्या एफडीवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे. जर तुम्हीही FD करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण आता HDFC बँकेमध्ये एफडी केल्यास मोठा फायदा होणार आहे.

HDFC बँकेच्या ग्राहकांना होणार फायदा :

HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेव असलेल्या रकमेसाठी निश्चित कालावधीच्या FD दरात 25 bps पर्यंत वाढ केली आहे. HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर 9 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.5 टक्के ते 7.75 टक्के व्याज देत आहे.

HDFC Bank FD RATE l HDFC बँकेने 18 महिन्यांपासून ते 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधी असलेला व्याजदर हा 7 टक्क्यांवरून 7.25 टक्के केला आहे. एचडीएफसी बँक सध्या 7 दिवस ते 29 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर सामान्य गुंतवणूकदारांना 3 टक्के व्याज देत आहे.

त्याचवेळी, 30 दिवस ते 45 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 3.50 टक्के व्याज दिले जाणार आहे. तसेच 46 दिवस ते 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.50 टक्के व्याज दिले जाणार आहे. बँक 6 महिने ते एक दिवस आणि 9 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 5.75 टक्के व्याज देत आहे. यासह, बँक 9 महिने, 1 दिवस आणि 1 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 6 टक्के नफा देणार आहे.

HDFC Bank FD RATE l गुंतवणूकदारांना मिळणार इतकी टक्केवारी :

सध्या 1 वर्ष आणि 15 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 6.60 टक्के व्याज दिले जाते. याशिवाय 15 ते 18 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर तब्बल 7.10 टक्के व्याज मिळते. बँकेने 18 महिन्यांपासून ते 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 25 bps ने 7 टक्क्यांवरून 7.25 टक्के केला आहे. HDFC बँक आता 21 महिने ते 2 वर्षे आणि 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदतीच्या ठेवींवर 7 टक्के व्याज देईल.

ज्येष्ठांना मिळणार लाभ :

बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.5 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर देत आहे. तर बँक 18 ते 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधी असलेल्या कालावधीवर तब्बल 7.75 टक्के व्याज देत आहे. यासोबतच HDFC बँकेने त्यांच्या ठेवींवरील व्याजदरात पुन्हा सुधारणा केली आहे. यावेळी 18 महिन्यांपासून 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर व्याजदर तब्बल 20 bps ने वाढवून म्हणजेच 7.05 टक्क्यांवरून 7.25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

News Title : HDFC Bank hiked interest rates on its FD 

महत्त्वाच्या बातम्या-

अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी समोर

“फारच कंटाळा आला तर भजन करायचं….”, पुतण्याचा काकांना पुन्हा सल्ला

‘बिग बी यांच्यावर 90 कोटींचं कर्ज, शिवाय मालमत्ताही जप्त’, जया बच्चन यांचा गौप्यस्फोट

7 तास थांबवून ठेवलं, नंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवतारेंना समज, म्हणाले…

अजित पवारांना धक्का?, लंकेंनंतर ‘हा’ बडा नेता शरद पवारांकडे परतणार?