Amitabh Bachchan | बॉलिवूडचे महानायक अर्थातच अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना आज सकाळी (15 मार्च) 6 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बिग-बी यांच्या पायात क्लॉट झाल्यानं अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली
अमिताभ बच्चन यांनी नुकतंच एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं,”मी तुमचा सदैव आभारी आहे.” अँजिओप्लास्टीनंतर बिग बींनी हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहेत, असा अंदाज हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकरी लावत आहेत.
T 4950 – in gratitude ever ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 15, 2024
रिपोर्टनुसार अमिताभ (Amitabh Bachchan ) यांना 2022 मध्ये कौन बनेगा करोडपती-14 या शोदरम्यान पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. तेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोकिलाबेनमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली
अँजिओप्लास्टी झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांना सुट्टी देण्यात आल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ते त्यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोन आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटात बिग बी (Amitabh Bachchan) एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. अमिताभ बच्चन शेवटचे टायगर श्रॉफसोबत गणपत चित्रपटात दिसले होते. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.
News Title-Big update on Amitabh Bachchan health
महत्त्वाच्या बातम्या –
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा!
अवघ्या काही तासात सुरु होणार WPL एलिमिनेटर सामना; कुठे व किती वाजता पाहता येणार
नववर्षात होंडा कंपनी ग्राहकांना देणार मोठा धक्का; 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल
राजकारणात खळबळ! 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल
अनेक संघाना घाम फुटणार; दिल्ली कॅपिटल्समध्ये 29 चेंडूत शतक झळकावणाऱ्या खेळाडूची एन्ट्री