एकीकडे नणंद-भावजय, तर दुसरीकडे सासरे विरूद्ध सून आमनेसामने?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Loksabha Election | बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. नणंद आणि भाऊजयमध्ये लढत होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. असाच काहीसा प्रत्यय आता रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकतो. बारामतीप्रमाणे रावेर लोकसभा मतदार संघामध्ये सासरे विरोधात सून लढणार असल्याची चर्चा आहे. (Raksha Khadase)

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यामान खासदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadase) यांनी पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपने संधी दिली आहे. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये सासरे विरूद्ध सून हे आता एकमेकांविरोधात लढणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता स्वत: रक्षा खडसे (Raksha Khadase) यांनी माध्यमांशी बोलत असताना वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाल्या रक्षा खडसे?

बारामतीमध्ये नणंद आणि भाऊजयप्रमाणे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये सासरे विरोधात सून अशी लढत पाहायला मिळेल, असं माध्यमांनी रक्षा खडसे (Raksha Khadase) यांना विचारलं असता त्या उत्तरल्या आहेत. रक्षा खडसे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात नणंद असो की सासरे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

रावेरमध्ये आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष नाराज आहेत, काहींनी तर राजीनामा देणार असल्याचं सांगितलं आहे, असं विचारण्यात आलं त्यावर रक्षा खडसे म्हणाल्या, की मतदारसंघामध्ये कोणतीही नाराजी नाही. सर्वांनी मला विश्वास दिला आहे. कोणतीही कमतरता भासू देणार नाही. सर्वांनी मिळून एकमताने विजय मिळवून देऊ, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

“आता समोर नणंद असो की सासरे पूर्ण ताकदीने लढणार”

रावेर मतदारसंघामध्ये रोहिणी खडसे किंवा एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे, यावर बोलत असताना रक्षा खडसे म्हणाल्या, आता लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात नणंद असो की भाऊजय पूर्ण ताकदीने उतरायचं, कारण पक्षाने माझ्यावर विश्वास दिला आहे.

नाथाभाऊंनी दिले आशीर्वाद

एकनाथ खडसे आणि घरातील सर्वांनी मला आशीर्वाद दिले आहेत. पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

News Title – Raksha Khadase Raver Loksabha Election Ticket

महत्त्वाच्या बातम्या

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे दर

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागांना यलो अलर्ट

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती चिंताजनक!

भाजपनं सुधीर मुनगंटीवरांना बळंच बसवलं घोड्यावर!, इच्छा नसताना होणार का खासदार?

आजपासून खरमास सुरू, पुढील 30 दिवस चुकूनही शुभ कार्य करू नये