Sharad Ponkshe | मराठी अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. अनेक वेळा त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जातं. एवढंच नाही तर त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टिका सुद्धा होत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पोंक्षेंनी एक वक्तव्य केलं त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. सोशल मीडियावर सुद्धा नेटकऱ्यांनी त्यांची शाळा घेतली होती. दरम्यान, शरद पोंक्षेंची पुन्हा एकदा नवीन पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
पोस्टमध्ये काय लिहिलं?
अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी महिला दिना निमित्ताने आपल्या फेसबुकवरुन मुलगी सिद्धीबदल एक पोस्ट शेअर केली. त्यांनी शेअर केलेल्या त्या पोस्टचं काहींनी कौतुक केलं तर काहीजणांनी त्यांना ट्रोल करत त्यांच्यावर टिका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेअर केलेल्या पोस्टवर आलेल्या कमेंसवर स्वतः शरद पोंक्षे उत्तर देत होते. दरम्यान, त्यामध्ये त्यांनी दिलेल्या उत्तरावर सगळ्यांचं लक्ष वेधलं.
तुम्ही शूद्र मनाचे माणूस-
शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी आपल्या मुलीसाठी महिला दिना निमित्ताने पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, महिला दिनाच्या शुभेच्छा. माझी मुलगी सिद्धी आधी पायलट होती. मात्र, काल ती फ्लाइट इन्स्ट्रक्टर झाली आहे. सिद्धीने स्वकष्टाने , मेहनतीने, कोणाच्याही मदतीशिवाय, हे यश संपादन केलं आहे. एका बापाला आणखी काय हवं? अभिनंदन सिध्दी,” अशी पोस्ट शेअर केली.
अनेक जणांनी शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या पोस्टवर कमेंटस केल्या. यामध्ये पोंक्षे साहेब, माणूस हा समाजशील प्राणी आहे. प्रत्येक गोष्ट शिकताना आपल्याला कोणाची ना कोणाची मदत घ्यावीच लागते. तुमच्या कन्येला देखील प्रशिक्षण काळात शिक्षकांची गरज लागलीच असेल. असूद्या त्या शिक्षकांचे आम्ही आभार मानतो. “तुम्ही खरंच शूद्र मनाचे अतिशय शूद्र माणूस आहात,” God bless you”, अशी कमेंट एका युजरने केली होती.
मात्र, चर्चा झाली ती त्या शरद पोंक्षे यांनी दिलेल्या उत्तराची. शरद पोंक्षें म्हणाले की, “मराठी भाषा तुम्हाला कळत नाही, असं दिसतंय. असो शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. शुद्र कोण?” असं उत्तर दिलं आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं.
News Title : sharad ponkshe facebook post goes viral
महत्त्वाच्या बातम्या-
अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज; होईल फायदाच फायदा
अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी समोर
“फारच कंटाळा आला तर भजन करायचं….”, पुतण्याचा काकांना पुन्हा सल्ला
‘बिग बी यांच्यावर 90 कोटींचं कर्ज, शिवाय मालमत्ताही जप्त’, जया बच्चन यांचा गौप्यस्फोट