टप्पू-बबिताच्या साखरपुड्याच्या चर्चेदरम्यान TMKOC टीमच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Munmun Dutta | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मुनमुन दत्ता ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे घराघरात प्रचलित आहे. तिला ‘बबीताजी’ म्हणून ओळखलं जातं. मात्र बऱ्याच दिवसांपासून याच मालिकेत टप्पूची भूमिका साकारलेला अभिनेता राज अनाडकत आणि मुनमुन यांच्या नात्याच्या चर्चा होत आहेत.

अशातच त्यांनी साखरपुडा उरकल्याचीही बातमी माध्यमांमध्ये झळकून आली. त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चा जोरदार रंगल्या. नंतर त्यांनी दोघांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं असलं तरी आता पुन्हा एकदा मुनमुन आणि राज चर्चेत आले आहेत. ‘तारक मेहता..’ मेकर्सनेही बबीताची फिरकी घेतल्याने याबाबत अजूनच बोललं जात आहे.

‘तारक मेहता..’ टीमने घेतली अभिनेत्रीची फिरकी

‘तारक मेहता..’ च्या टीमने सोशल मिडियावर मालिकेविषयी पोस्ट करताना त्यात मुनमुनची मस्करी केली आहे. टीमने सोशल मीडियावर प्रमोशन करताना मुनमुन आणि राजच्या साखरपुड्याच्या चर्चांचा आधार घेतला. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर पोस्ट केलं आहे.

यामध्ये बबिताजी उर्फ मुनमुन (Munmun Dutta) फोनवर बोलताना दिसत असून तिच्यासमोर लिहिलंय ‘हॅलो.. एक गुड न्यूज आहे.’ यात अजून एक स्ट्रॅपलाइनसुद्धा लिहिली आहे. ‘बबिताजींची गुड न्यूज काय असेल?’ असा सवाल त्यात विचारण्यात आला आहे. या पोस्टवर आता नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

टप्पू आणि बबीताच्या साखरपुड्याच्या चर्चा

नेटकरी देखील मुनमुनची मज्जा घेत आहेत.अनेक मिश्किल प्रतिक्रिया या पोस्टवर उमटत आहेत. दरम्यान, साखरपुड्याच्या चर्चा खोट्या आणि निव्वळ हास्यास्पद असल्याचं मुनमुनने म्हटलं आहे. राजनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहित साखरपुड्याच्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे.

“एकदम वाईट आणि हास्यास्पद! या व्हायरल बातमीत काहीच तथ्य नाहीये. मी अशा खोट्या बातम्यांवर माझा वेळ आणि शक्ती वाया घालवणार नाही.” असं मुनमुनने (Munmun Dutta) म्हटलं आहे. तर, “सोशल मीडियावर व्हायरल होणारी बातमी ही पूर्णपणे खोटी आणि अर्थहीन असून, यावर कोणीही विश्वास ठेऊ नका” असं स्पष्टीकरण राज अनादकटने (Raj Anadkat Aka Tappu) दिलं आहे.

News Title-  Taarak Mehta Makers Teased Babita Ji Aka Munmun Dutta

महत्त्वाच्या बातम्या –

“ब्रीजभूषण यांच्याविरोधात आवाज उठवल्यापासूनच मला…”, विनेश फोगाट संतापली

मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया

“भाजपची गॅरंटी चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक”

“त्यांनी एकदा स्पष्टच करावं की…”, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, सरकारची घोषणा