राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी?; बड्या नेत्याने श्रीकांत शिंदेंना सुनावलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांशी फारकत घेत भाजपशी हात मिळवणी केली आहे. त्यामुळे आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे भाजप, शिंदे गट आणि अजित गट आता सत्तेत आहेत. अशात राष्ट्रवादी अजित पवार गटातील बड्या नेत्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी खासदार तथा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे राजकारणात याची चांगलीच चर्चा होत आहे. भुजबळ यांनी श्रीकांत शिंदेंना खडेबोल सुनावले आहेत. त्यांच्यात नाशिकच्या उमेदवारीवरून संघर्ष पाहायला मिळत आहे.

छगन भुजबळ यांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा

श्रीकांत शिंदे या आठवड्यामध्ये नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हेमंत गोडसे लोकसभेचे उमेदवार असतील, असं जाहीर केलं. मात्र, महायुतीमध्ये जागा वाटप संदर्भात अजून तिढा सुटला नसताना त्यांची ही घोषणा भुजबळ यांना चांगलीच खटकल्याचं दिसतंय.

भाजपने नुकतीच त्यांच्याकडे आधीपासूनच असलेल्या 20 उमेदवारांची नाव दुसऱ्या यादीत जाहीर केली आहेत. पण, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या तिढा असलेल्या जागांवर उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झाली नाहीत. अशात श्रीकांत शिंदे यांच्या परस्पर घोषणेमुळे भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांची शाळा घेतली.

‘श्रीकांत यांनी थोडी शिस्त पाळली पाहिजे’

श्रीकांत शिंदे यांनी उमेदवार जाहीर केल्याने महायुतीमध्ये नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी “नाशिकची जागा जाहीर करण्याचा श्रीकांत यांना अधिकार नाही, त्यांनी थोडी शिस्त पाळली पाहिजे”, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

यावेळी भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. जयंत पाटील स्वतः अनेकांच्या संपर्कात आहेत, त्यावर निर्णय होऊदे मग नंतर बघू. असं यावेळी भुजबळ म्हणाले. दरम्यान, नाशिकमधील उमेदवारीवरून शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title-  Chhagan Bhujbal on Shrikant Shinde

महत्त्वाच्या बातम्या –

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा!

अवघ्या काही तासात सुरु होणार WPL एलिमिनेटर सामना; कुठे व किती वाजता पाहता येणार

नववर्षात होंडा कंपनी ग्राहकांना देणार मोठा धक्का; 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल

राजकारणात खळबळ! 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल

अनेक संघाना घाम फुटणार; दिल्ली कॅपिटल्समध्ये 29 चेंडूत शतक झळकावणाऱ्या खेळाडूची एन्ट्री