सर्वसामान्यांना मोठा झटका! 800 पेक्षा अधिक औषधे महागणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Drugs Medicine | सर्वसामान्यांना आता इलाजासाठी दुप्पट पैसा मोजावा लागणार आहे. अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढवण्यात येणार असल्याने सर्वसामांन्य जनतेला मोठा फटका बसणार आहे. तब्बल 800 पेक्षा अधिक औषधांच्या किमती वाढवण्यात येणार आहेत.

येत्या 1 एप्रिलपासून 800 औषधांची दरवाढ होणार आहे. यामध्ये वेदनाशामक (Painkillers) आणि प्रतिजैवकांसह (Antibiotics) इतर औषधांचा समावेश आहे. येत्या 1 एप्रिलपासून या किमती वाढणार आहेत.

1 एप्रिलपासून औषधांच्या किमती वाढणार

वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकानुसार (WPI) औषधांच्या दरवाढीला केंद्र सरकारकडून अनुकूल मंजुरी मिळू शकते. कच्चा मालाच्या किंमती वाढल्याने, महागाईमुळे फार्मा इंडस्ट्रीकडून औषधांच्या किंमतीत (Drugs Medicine) वाढ करण्याची मागणी केली जात होती.

त्यामुळे वार्षीक घाऊक किंमत निर्देशांकानुसार (WPI) केंद्र सरकार .0055% पर्यंत दरवाढीला मंजुरी देऊ शकते. औषधांच्या किंमतीमध्ये गेल्यावर्षी आणि 2022 मध्ये अनुक्रमे रेकॉर्ड ब्रेक 12% आणि 10% दरवाढ झालेली आहे. त्यामुळे ही वृद्धी त्यामानाने नगण्यच असेल.

800 पेक्षा अधिक औषधी महागणार

ज्याची किमत वाढवली जाणार आहे त्या औषधांची राष्ट्रीय यादी तयार करण्यात आलेली आहे, त्यात 800 पेक्षा अधिक औषधांचा समावेश आहे. नियमानुसार, वर्षातून एकदा नियोजीत औषधांच्या किंमतीत (Drugs Medicine) बदल करण्याची परवानगी आहे.

या यादीमध्ये पॅरासिटामॉल सारखी औषधे, ॲझिथ्रोमायसिन अँटीबायोटिक्स, ॲनिमिया औषधे, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश आहे. कोविड-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी वापरात येणाऱ्या औषधांचा, स्टेरॉईडचा देखील या यादीत समावेश आहे. या औषधांच्या किंमतीत काही वाढ करण्याची मागणी केली जात होती.

News Title- Drugs Medicine Will Become More Expensive From April 1

महत्त्वाच्या बातम्या –

“ब्रीजभूषण यांच्याविरोधात आवाज उठवल्यापासूनच मला…”, विनेश फोगाट संतापली

मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया

“भाजपची गॅरंटी चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक”

“त्यांनी एकदा स्पष्टच करावं की…”, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, सरकारची घोषणा