शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट?; महादेव जानकरांचा अखेर खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahadev Jankar | राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार आणि शरद पवार हे आता वेगळे झाले आहेत. माढा मतदारसंघामधून शरद पवार हे रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा होत्या. यापार्श्वभूमीवर मुंबईमध्ये महादेव जानकर (Mahadev Jankar) शरद पवार यांची भेट घेणार होते.

महादेव जानकर यांची पवारांसोबत भेट झाली?

महादेव जानकर (Mahadev Jankar) हे मुंबईमध्ये गेले यावेळी त्यांना माध्यमांनी माढा लोकसभेतून निवडणूक लढण्याबाबत शरद पवार यांची भेट घेतली का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावेळी त्यांनी शरद पवार साहेब यांच्यासोबत माझी भेट झाली नाही, असं महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले.

माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्याविरोधात तगडा नेते उभा करायचा आहे. या जागा शरद पवार गटाच्या नेत्याला उमेदवारी द्यायची आहे. पण शरद पवार गटातील नेता माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही. कारण त्याजागी महादेव जानकर यांना संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत.

काय म्हणाले महादेव जानकर?

“माझी आणि शरद पवारसाहेबांनी भेट झाली नाही. मी देशोन्नतीच्या संपादकांना भेटायला गेलो होतो. शरद पवार साहेबांनी मला म्हाडाची जागा देऊ केली आहे. मात्र मी माढा आणि परभणी मतदारसंघासाठी निवडणूक लढवायला इच्छूक आहे. महाविकास आघाडीने अजूनही आम्हाला बैठकीसाठी बोलावलं नाही”, असं महादेव जानकर म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी माढा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांना संधी दिली असल्याची चर्चा आहे. मात्र या जागेवर शेकापच्या जयंत पाटील यांनी दावा केला आहे. यामुळे ही जागा महादेव जानकर यांना दिली जाईल की शेतकरी कामगार पक्षाला दिली जाईल हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

जयंत पाटील की महादेव जानकर?

हतकणंगले आणि माढामध्ये शेकापची मोठी ताकद असल्याचं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे. म्हणून जयंत पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा दर्शवली आहे. आता जयंत पाटील की महादेव जानकर यामध्ये संभ्रम आहे.

News Title – Mahadev Jankar Meet With Sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या

एकीकडे नणंद-भावजय, तर दुसरीकडे सासरे विरूद्ध सून आमनेसामने?

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज; होईल फायदाच फायदा

अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी समोर

“फारच कंटाळा आला तर भजन करायचं….”, पुतण्याचा काकांना पुन्हा सल्ला