शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tanaji Sawant | लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत. सध्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे धुरा सांभाळत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे गटाचा भावी मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे भावी मुख्यमंत्री (Future Cm) आशयाचे बॅनर पुण्यात लावण्यात आल्याने चर्चांनी जोर धरला आहे.

तानाजी सावंत भावी मुख्यमंत्री होणार?

पक्षाचे कार्यकर्ते उत्साही असतात. ते कधी काय करतील याचा नेम नाही. याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, इंदापूर येथे ओबीसी मेळाव्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या भावी मुख्यमंत्री आशयाची बॅनरबाजी केली होती. आता तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये बॅनरबाजी केली. (Tanaji Sawant)

पुणे शहरामध्ये अनेक नेत्यांची बॅनरबाजी पाहायला मिळते. भावी आमदार, भावी खासदार, भावी मुख्यमंत्री यांच्या नावाची बॅनरबाजी होताना दिसते. त्यामध्ये तानाजी सावंत (Tanaji Sawant) याचं नाव पाहायला मिळते. यामुळे राजकीय चर्चांनी जोर धरला आहे. कात्रज चौकामध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत.

tanaji sawant 1

पुण्यामध्ये भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यांनी प्रचारासाठी सुरूवात देखील केली आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात तानाजी सावंत यांचे लागलेले बॅनर लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

दरम्यान भावी मुख्यमंत्री येत्य़ा वर्षामध्ये विधानसभेमध्ये कोण होईल हे कळेलच. महायुती पुन्हा एकदा विधानसभेमध्ये निवडून आली तर, राज्याचे विद्यामान मुख्यमंत्री अजित पवार यांना देखील मुख्यमंत्री पद मिळू शकतं.

तसेच महाविकास आघाडी विजयी झाल्यास आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकी एकाला भावी मुख्यमंत्री पद देण्यात येईल अशी चर्चा आहे.

News Title – Tanaji Sawant Future Cm Banner At pune

महत्त्वाच्या बातम्या

“ब्रीजभूषण यांच्याविरोधात आवाज उठवल्यापासूनच मला…”, विनेश फोगाट संतापली

मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया

“भाजपची गॅरंटी चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक”

“त्यांनी एकदा स्पष्टच करावं की…”, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, सरकारची घोषणा