श्रेयंका पाटील आरसीबीसाठी ठरली गेम चेंजर; मुंबईच्या पराभवामागे हे ठरले मोठे कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RCB vs MI Eliminator l रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा 5 धावांनी पराभव केला आहे. आरसीबीने अतिशय रोमांचक विजय नोंदवला आहे. प्रथम फलंदाजी करताना 135 धावा केल्या त्याच प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 130 धावा करू शकला.आरसीबीकडून श्रेयंका पाटील आणि एलिस पॅरी यांनी चमकदार कामगिरी केली. तर सामन्यात एलिस पेरीने अर्धशतक झळकावले आहे. तर श्रेयंकाने 2 बळी घेतले आहेत.

RCB vs MI Eliminator l मुंबईच्या पराभवामागे काही महत्त्वाची कारणे :

मुंबई इंडियन्सच्या संघाला चांगल्या सुरुवातीचे भांडवल करता आले नाही. MI ने आरसीबीच्या डावात 20 धावांवर पहिली विकेट घेतली. 20 धावांच्या स्कोअरवर दुसरी विकेटही पडली. 23 धावांच्या स्कोअरवर तिसरी विकेट पडली. पण मुंबईच्या गोलंदाजांना एलिस पेरीला योग्य वेळी बाद करता आले नाही.

पॅरीने 50 चेंडूंचा सामना करत 66 धावा केल्या. तिने 8 चौकार आणि 1 षटकार मारला. वेअरहमच्या शेवटच्या 18 धावाही मुंबईसाठी महागड्या ठरल्या आहेत. तिने 10 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार ठोकले आहेत.

RCB vs MI Eliminator l श्रेयंका पाटीलची आरसीबीसाठी महत्त्वाची कामगिरी :

मुंबईच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर एक टोक घट्ट पकडून कोणीही खेळणार नव्हते. संघाची सलामीवीर यस्तिका 19 धावा करून बाद झाली आहे. हीली मॅथ्यूज 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तर नॅट सायव्हर ब्रंट 23 धावा करून नाबाद राहिली. कर्णधार हरमनप्रीत कौर 33 धावा करून बाद झाली. एमिलिया केर 27 धावा करून नाबाद राहिली. मात्र तिने 25 चेंडूत केवळ 2 चौकार मारले.

श्रेयंका पाटीलसह इतर गोलंदाजांची कामगिरीही आरसीबीसाठी महत्त्वाची होती. श्रेयंकाने 4 षटकात 16 धावा देत 2 बळी घेतल्या आहेत. तर या सामन्यात ॲलिस पॅरीने अष्टपैलू कामगिरी केली आहे. अर्धशतकानंतर तिने एक विकेट घेतली. पॅरीने 4 षटकात 29 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. सोफिया, जॉर्जिया वेरहॅम आणि आशा यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला आहे.

News Ttile : Shreyanka Patil’s key performance for RCB

महत्त्वाच्या बातम्या – 

शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण

शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट?; महादेव जानकरांचा अखेर खुलासा

सर्वसामान्यांना मोठा झटका! 800 पेक्षा अधिक औषधे महागणार

दिलासादायक बातमी! पुढील 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पुढील ‘इतके’ दिवस पाणीकपात होणार