उद्या DC Vs RCB मध्ये रंगणार महाअंतिम सामना? कोण वरचढ ठरणार

WPL 2024 Final l महिला प्रीमियर लीगचा (WPL 2024) हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. WPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) हे दोन अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. दिल्लीचा संघ हा पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहून थेट अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या RCBने दुसऱ्या क्रमांकाच्या मुंबई इंडियन्सला एलिमिनेटरमध्ये पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे.

WPL 2024 Final l कधी व कुठे रंगणार अंतिम सामना? :

अशातच आता यंदाच्या वर्षातील WPl चा अंतिम सामना हा उद्या म्हणजेच रविवार, १७ मार्च रोजी होणार आहे. विजेतेपदासाठी दोन्ही संघ दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. हा अंतिम सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. अंतिम सामन्याबाबत चाहत्यांना आशा आहे की जे काम आरसीबी पुरुष संघ 16 वर्षे करू शकला नाही, ते काम महिला संघ दुसऱ्या वर्षी किंवा दुसऱ्या सत्रात करेल. म्हणजेच पुरुषांच्या आधी आरसीबी महिला संघ विजेतेपद पटकावेल अशी आशा चाहत्यांना आहे.

आरसीबी आणि दिल्ली यांच्यातील विजेतेपदाचा सामना खूपच मनोरंजक असणार आहे. एका बाजूला या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारा दिल्ली कॅपिटल्स संघ असेल तर दुसऱ्या बाजूला आरसीबीचा मोठा चाहता वर्ग असेल. WPl लीग टप्प्यात दिल्लीने 8 पैकी 6 सामने जिंकले होते, तर RCB संघाला 8 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले आहेत.

RCB Vs DC रेकॉर्ड काय आहेत?

WPL 2024 Final l आरसीबीचा या हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा विक्रम अजिबात चांगला राहिला नाही. या दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या मोसमातील पहिल्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 25 धावांनी विजय मिळवला. यानंतर दुसऱ्या साखळी सामन्यात दिल्लीने आरसीबीचा 1 धावेने पराभव केला आहे. अशा स्थितीत अंतिम फेरीत दिल्लीचे आव्हान आरसीबीसाठी सोपे नसणार आहे.

तर आरसीबीने गेल्या दोन सामन्यांमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीचे दरवाजे स्वत:साठी उघडले. अशा परिस्थितीत आरसीबीला पराभूत करणे दिल्लीसाठी इतके सोपे नसणार आहे.

News Title : WPL 2024 Final Match Live

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रेयंका पाटील आरसीबीसाठी ठरली गेम चेंजर; मुंबईच्या पराभवामागे हे ठरले मोठे कारण

शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण

शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट?; महादेव जानकरांचा अखेर खुलासा

सर्वसामान्यांना मोठा झटका! 800 पेक्षा अधिक औषधे महागणार

दिलासादायक बातमी! पुढील 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत