तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करण्याचं स्वप्न होणार साकार; जबरदस्त फीचर्ससह CNG कार बाजारात येणार

Tata Nexon CNG l आजकाल युवा पिढी CNG कार खरेदी करण्याला जास्त भर देतात. अशातच Tata Nexon लवकरच CNG प्रकार भारतीय बाजारपेठेत दाखल करण्याच्या तयारीत आहे. या कारची चाचणी सध्या सुरू करण्यात आली आहे. अगदी काही दिवसांपूर्वी Tata Nexon ची CNG आवृत्ती 2024 मध्ये आयोजित भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. तेव्हापासून या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या सीएनजी मॉडेलची प्रतीक्षा केली जात आहे. तर आज आपण या बहुचर्चित Tata Nexon CNG मॉडेलचे वैशिष्ट्ये जाणून घेऊयात…

Tata Nexon च्या CNG मॉडेलचे वैशिष्ट्ये :

Tata Nexon ची फेसलिफ्ट आवृत्ती मागील वर्षी लाँच करण्यात आली होती, ज्यामध्ये प्री-फेसलिफ्ट आवृत्ती प्रमाणेच टर्बो पॅनल आणि डिझेल इंजिन होते. Tata Nexon CNG ही पहिली कार असेल ज्यामध्ये CNG व्हेरियंटसह टर्बो पेट्रोल इंजिन दिले जात आहे. या वाहनाचे मॅन्युअल आणि एएमटी असे दोन्ही पर्याय बाजारात उपलब्ध होऊ शकतात.

Tata Nexon च्या CNG प्रकारात 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. याशिवाय कारमध्ये 10.25 इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट या सुविधा देखील कारमध्ये देण्यात आल्या आहेत. सुरक्षेचा विचार केला तर कारमध्ये 6 एअर बॅग देण्यात आल्या आहेत. याशिवाय वाहनात आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकरही दिले जात आहेत. सुरक्षिततेसाठी, वाहन 360 डिग्री कॅमेऱ्यासह ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरसह सुसज्ज आहे.

Tata Nexon CNG l 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन :

Tata Nexon त्याच्या CNG प्रकारात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्याची शक्यता आहे. याशिवाय कारच्या या मॉडेलमध्ये एएमटीचा पर्यायही मिळण्याची शक्यता आहे. टाटाने टियागो आणि टिगोर मॉडेल्समध्ये एएमटीचा पर्यायही दिला होता. कारच्या परफॉर्मन्स आणि मायलेजबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

News Title : Upcoming Tata Nexon CNG Car

महत्त्वाच्या बातम्या – 

उद्या DC Vs RCB मध्ये रंगणार महाअंतिम सामना? कोण वरचढ ठरणार

श्रेयंका पाटील आरसीबीसाठी ठरली गेम चेंजर; मुंबईच्या पराभवामागे हे ठरले मोठे कारण

शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण

शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट?; महादेव जानकरांचा अखेर खुलासा

सर्वसामान्यांना मोठा झटका! 800 पेक्षा अधिक औषधे महागणार