तरुणांसाठी खुशखबर; सेबीमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज

Goverment job

SEBI Recruitment 2024 l तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. SEBI ने ग्रेड A असिस्टंट मॅनेजरच्या पदांवर भरती जाहीर केली आहे. या पदांशी संबंधित पात्रता असलेले इच्छुक उमेदवार sebi.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. सेबीच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे अंतिम मुदतीच्या आधी उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहे.

SEBI Recruitment 2024 l सेबीमध्ये या पदांवर केली भरती जाणार :

SEBI च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 13 एप्रिल पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून एकूण 97 पदांची भरती होणार आहे. तुम्हालाही या पदांवर नोकरी मिळवायची असेल तर या दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.

SEBI च्या या भरती मोहिमेअंतर्गत, 97 ग्रेड A सहाय्यक व्यवस्थापक पदे, सामान्य, विधी, IT, अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल), संशोधन आणि राजभाषाया विभागांत पदे भरण्यात येणार आहेत.

सेबीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी वयोमर्यादा किती आहे? :

SEBI च्या या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांची कमाल वयोमर्यादा 31 मार्च 2024 पर्यंत 30 वर्षे असावी लागणार आहे.

SEBI Recruitment 2024 l या आधारावर सेबीमध्ये निवड केली जाणार? :

सेबीमध्ये अर्ज करणाऱ्या सर्व इकचुक उमेदवारांची तीन टप्प्यांत निवड केली जाणार आहे. पहिला टप्पा हा ऑनलाइन परीक्षेचा असेल, ज्यामध्ये दोन पेपर असतील. फेज I परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार फेज II परीक्षेस बसतील. दोन्ही पेपरची ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

सेबीमध्ये अर्ज करण्यासाठी किती शुल्क भरावे लागेल? :

Open/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 1000 रुपये भरावे लागणार आहेत. तर SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांना माहिती शुल्क म्हणून केवळ 100 रुपये भरावे लागतील.

News title : SEBI Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या – 

 

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .