आचारसंहिता म्हणजे काय? या दरम्यान कोणत्या गोष्टींवर बंदी असते

What is Code of Conduct? l देशात आज 18व्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, ज्याच्या तारखा निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे. निवडणुकांच्या तारखेच्या घोषणेनंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू होते, त्यामुळे अनेक निर्बंध देखील लादण्यात येतात. देशात पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या स्वरूपात काही नियम निश्चित केली आहेत, ज्यांचे पालन सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी करणे अनिवार्यपणे असते.

What is Code of Conduct? l तरतुदी काय आहेत? :

निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांसाठी सामान्य आचरणापासून ते सभा, मिरवणुका, मतदान, मतदान केंद्र, निरीक्षक आणि जाहीरनामा यांसाठी नियमावली निश्चित केली आहे.

What is Code of Conduct? l राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी या गोष्टी महत्वाच्या :

-विविध जाती आणि समुदायांमध्ये मतभेद किंवा द्वेष वाढेल असे कृत्य करू नये.

– कोणत्याही पक्षाच्या, नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य करू नका.

– कोणत्याही जाती-पंथाच्या भावनांचा वापर करून मतदान करण्याचे आवाहन करू नका.

– मंदिर, मशीद किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू नये.

– मतदारांना लाच देणे, त्यांना धमकावणे, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाते.

– मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक सभांवर बंदी लागू होईल.

– राजकीय पक्ष किंवा कोणत्याही उमेदवाराच्या घरासमोर आंदोलने व धरणे करू नये.

– नेते आपल्या समर्थकांना त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, परिसर भिंती इत्यादींवर झेंडे लावण्याची, बॅनर लावण्याची, माहिती पेस्ट करण्याची आणि घोषणा लिहिण्याची परवानगी देऊ शकत नाहीत.

– राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी अडथळे निर्माण करणार नाहीत किंवा इतर पक्षांच्या सभा किंवा मिरवणुकांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणार नाही याची काळजी घ्यावी.

– ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा सुरू आहेत त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाने मिरवणूक काढू नये. एका पक्षाने लावलेली पोस्टर्स दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढू नयेत.

News Title : What is Code of Conduct?

महत्त्वाच्या बातम्या –