उदयनराजे राजकारणातून संन्यास घेणार का?, केला सर्वात मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Udayanraje Bhosale Loksabha Elelction l सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वार फिरत आहे. अगदी काही दिवसांपूर्वी भाजपने लोकसभेच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीत राज्यातील 20 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिग्गज नेत्यांसह अगदी काही नव्या चेहऱ्यांना देखील संधी दिली आहे. मात्र भाजपने काही जुन्या नेत्यांना डावलल्याने काही दिग्गज नेत्यांमध्ये नाराजी पसरलेली दिसत आहे.

Udayanraje Bhosale Loksabha Elelction l भाजपच्या यादीत उद्यनराजेंचं नाव वगळले :

मात्र भाजपने काही महत्त्वाच्या नेत्यांना अजूनही वेटिंगवर ठेवल्याचे चित्र दिसत आहे. अशातच वेटिंगवर ठेवलेले भाजपचे दिग्गज नेते खासदार उदयनराजे भोसले हे आहेत. भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे राजेंचे समर्थक देखील चांगलेच तापले आहेत.

अशातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी एक मोठी मागणी केली आहे. जर राजेंना उमेदवारी न मिळाल्यास राजेंनी स्वबळावर लढावं अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.

Udayanraje Bhosale Loksabha Elelction l तिकिटावरून उद्यनराजेंनी रोखठोक मत केलं व्यक्त :

याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांच्या उमेदवारीबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले की, त्याबद्दल बोलणं हे औचित्य ठरणार नाही. तीन पक्ष एकत्र आलेले आहेत. सीट वाटपात पुढे मागे होऊ शकते. प्रत्येक पक्षाला वाटते की जास्त सीट मिळाव्यात. मात्र त्यामध्ये चुकीचं काहीही नाहीये. तसेच जे काही होईल ते नंतर बघू, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

त्यानंतर राजेंना तुमचा पुढचा निर्णय काय असेल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी राजे बोलताना म्हणाले की, मी काही संन्यास तर घेणार नाही एवढंच सांगतो. तसेच संन्यास घेणार नाही यामध्येच सगळं आलं आहे. तसेच माझ्याकडे देखील तिकीट आहे.पण प्लेनचं, बसचं,  रेल्वेच, पिक्चरचं अशा मिश्किल शब्दांत त्यांनी उत्तर दिल आहे. तसेच बाकीच्यांच्या तिकीटाचं मला अद्याप माहीत नाही व पक्ष ठरवतील त्यावेळी बघू असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिल आहे.

News Title : Udayanraje Bhosale Loksabha Elelction

महत्त्वाच्या बातम्या –