“वयाने लहान मुलाशी लग्न केलं तरी..”, बबिताजीची पोस्ट नेमकी कुणासाठी?

Munmun Dutta | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता उर्फ ‘बबीताजी’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मुनमुन आणि याच मालिकेत टप्पूची भूमिका साकारलेला अभिनेता राज अनाडकत यांच्या नात्याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत.

राज आणि मुनमुन यांनी दोघांनी गुपचुप साखरपुडा उरकल्याची जोरदार चर्चा झाली होती. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अशातच मुनमुन हिने केलेली अजून एक पोस्ट चर्चेत आली आहे. तिने लग्न करण्यात वयाचा काहीच मुद्दा नसल्याचं म्हटलं आहे.

“माझं लग्नही झालेलं नाही आणि मी गरोदरही नाही” :

मुनमुनच्या या पोस्टमुळे नेटकरी पुन्हा तिची फिरकी घेत आहेत. तिच्या या पोस्टचा संदर्भ नेटकरी आता टप्पू उर्फ राज अनाडकत सोबत लावत आहेत. त्यामुळे मुनमुन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने साखरपुड्याच्या चर्चा अफवा असल्याचं म्हटलं असलं तरी या पोस्टमुळे ती परत एकदा चर्चेत आलीये.

मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही पोस्ट लिहिल्या आहेत. या पोस्टद्वारे तिने ट्रोलर्सनाही सडेतोड उत्तर दिलं आहे. एका पोस्टमध्ये मुनमुनने लिहिलं, ‘हे अत्यंत हास्यास्पद आहे की कशा पद्धतीने खोट्या बातम्या वणव्यासारख्या पसरल्या जातात आणि बूमरँगप्रमाणे त्या पुन्हा चघळल्या जातात. पुन्हा एकदा सर्व गोष्टी स्पष्ट करते. माझा साखरपुडा झालेला नाही, लग्नही झालेलं नाही आणि मी गरोदरही नाही.’

“माझ्या बंगाली रक्तातच ही गोष्ट..” :

यानंतर दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने लिहिलं की, ‘मी जेव्हा कधी लग्न करेन तेव्हा मुलगा माझ्यापेक्षा वयाने लहान असला किंवा मोठा असला तरी मी अभिमानाने करेन. माझ्या बंगाली रक्तातच ही गोष्ट आहे. मी नेहमीच अभिमानाने आणि साहसाने गोष्टींना सामोरं जाते. जय मा दुर्गा!’, अशी पोस्ट लिहीत मुनमुनने ट्रोलर्सचं तोंड बंद केलं आहे.

‘अशा खोट्या गोष्टींवर मी माझी आणखी ऊर्जा वाया घालवणार नाही. त्यापेक्षा मी माझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे वळेन. देव प्रेमळ आणि दयाळू आहे. माझं आयुष्यही खूप सुंदर आहे’, असंही तिने शेवटी स्पष्ट केलं आहे. दरम्यान मुनमुन गेल्या 15 वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बबिताची भूमिका साकारतेय. तर राजने बऱ्याच दिवसांपूर्वीच मालिका सोडली आहे.

News Title- Munmun Dutta post in discussion

महत्त्वाच्या बातम्या –

उद्या DC Vs RCB मध्ये रंगणार महाअंतिम सामना? कोण वरचढ ठरणार

श्रेयंका पाटील आरसीबीसाठी ठरली गेम चेंजर; मुंबईच्या पराभवामागे हे ठरले मोठे कारण

शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण

शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट?; महादेव जानकरांचा अखेर खुलासा

सर्वसामान्यांना मोठा झटका! 800 पेक्षा अधिक औषधे महागणार