क्रिकेटप्रेमींना धक्का, निवडणुकांमुळे आयपीएलमध्ये मोठे बदल?,मोठी माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | भारतात आयपीएलचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आयपीएलची वाट चाहते आतुरतेने पाहत असतात. येत्या 22 मार्चपासून यंदाचा आयपीएल हंगाम सुरू होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयने आतापर्यंत केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

आता उर्वरित सामने कुठे होणार, याबाबत सर्वच चाहते जाणून घेण्यास आतुर आहेत. उर्वरित सामने निवडणुकांमुळे दुबईमध्ये खेळवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना भारतात लाईव्ह सामने पाहता येणार नाहीत. निवडणुका असल्याने हे सामने भारतात होण्याची शक्यता फार कमी आहे.

निवडणुकांमुळे आयपीएलमध्ये मोठे बदल?

निवडणूक आयोग आज (16 मार्च)निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. यानंतरच आयपीएलचे उर्वरित सामने दुबईमध्ये (IPL 2024 ) खेळवायचे की नाही याचा निर्णय बीसीसीआय घेणार आहे. सध्या बीसीसीआयचे काही उच्चपदस्थ अधिकारी दुबई दौऱ्यावर आहेत.

2014 साली देखील सुरूवातीचे सामने सार्वत्रिक निवडणुकांमुळे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये आयोजित केले होते. तसंच 2020 मध्येही आयपीएलचा संपूर्ण हंगाम कोविडमुळे भारतात न होता यूएईमध्ये खेळवण्यात आला होता. तर, 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत याचे सामने झाले होते.

उर्वरित सामने दुबईमध्ये होणार? :

यंदाही निवडणुकांमुळे उर्वरित सामने भारताऐवजी बाहेर आयोजित केली जाण्याची दाट शक्यता (IPL 2024 ) आहे. यासाठी दुबई पर्याय असल्याची माहिती मिळत आहे. यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात 7 एप्रिलला लखनऊ येथे होणार आहे.

तसेच आयपीएलचा पहिला सामना हा गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 22 मार्च रोजी चेन्नईच्या घरच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. त्यामुळे सर्वांनाच आता आयपीएलची उत्सुकता लागली आहे.

News Title- Big update about IPL 2024

 महत्त्वाच्या बातम्या –

तरुणांसाठी खुशखबर; सेबीमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज

तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करण्याचं स्वप्न होणार साकार; जबरदस्त फीचर्ससह CNG कार बाजारात येणार

उद्या DC Vs RCB मध्ये रंगणार महाअंतिम सामना? कोण वरचढ ठरणार

श्रेयंका पाटील आरसीबीसाठी ठरली गेम चेंजर; मुंबईच्या पराभवामागे हे ठरले मोठे कारण

शिंदे गटाचा नेता मुख्यमंत्री होणार?, बॅनरबाजीने चर्चांना उधाण