Election Commission | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता आता समोर आल्या आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या खर्चासाठी मर्यादा घातल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 48 जागा लढवल्या जाणार आहेत. त्या उमेदवारांना आता निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयानुसार खर्च करता येणार आहे.
उमेदवाराला यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी 95 लाख रूपये खर्च असणार आहे. याआधी म्हणजेच 2014 च्या निवडणुकीमध्ये खर्चाची मर्यादा ही 70 लाख होती. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने (Election Commission) दिली आहे.
लोकसभा आणि विधानसभा मर्यादा खर्च
राज्य आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्र भरल्यापासून निवडणूक खर्चाची गणना करण्यात येईल. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी 95 लाख रूपये खर्च असणार आहे. तर विधानसभेसाठी 40 लाख रूपये खर्च असणार आहे. (Election Commission)
उमेदवारांच्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य स्तरावर आणि जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण तसेच संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. पेड बातम्या आढळल्यास याप्रकरणी झालेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने (Election Commission) दिली आहे.
निवडणूक कधी होणार?
पहिला टप्पा – 19 फेब्रुवारी रामटेक, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर
दुसरा टप्पा – 26 एप्रिल बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.
तिसरा टप्पा – 7 मे रायगड, बारामती, धाराशीव लातूर, सोलापूर, म्हडा, सांगली, सिंधुदूर्ग-रत्नागिरी
चौथा टप्पा – 13 मे नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड येथे निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडेल.
पाचवा टप्पा – 20 धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मध्य.
News Title – Election Commission Decision lok sabha Election in 95 lakhs Limit
महत्वाच्या बातम्या
मनोज जरांगेंना मोठा धक्का; अडचणीत आणखी वाढ
58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, फोटो समोर
‘हा’ बडा नेता मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला!
मराठी इंडस्ट्री का मागे आहे? गश्मीर महाजनी म्हणाला…
“वयाने लहान मुलाशी लग्न केलं तरी..”, बबिताजीची पोस्ट नेमकी कुणासाठी?