उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख आता समोर आली आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना सोडून काही नेते एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. काही दिवसांआधी रवींद्र वायकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता आमश्या पाडवी यांनी देखील एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

नंदुरबारमध्ये आमश्या पाडवी यांच्या काही कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. एक आदिवासी नेत्याचा चेहरा एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला लाभला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे आणि दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत आमश्या पाडवी यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

आमश्या पाडवी यांनी 1995 मध्ये स्थानिक राजकारणाला सुरूवात केली आहे. अक्कलकुवा येथील पंचायतसमितीचे दोनदा सभापती झाले आहेत. 11 वर्षांपासून त्यांनी संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समुदायासाठी मोर्चे काढले आहेत. आमश्या यांनी 2014 मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.

पाडवी यांचा विधानसभेमध्ये दोनदा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाचं विधान परिषदेचं संख्याबळ कमी झालं आहे. याआधी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

रवींद्र वायकर यांच्याकडून दे धक्का

रवींद्र वायकर यांनी काही दिवसांआधी उद्धव ठाकरे गटाला राम राम करत एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे वायकर यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं आहे.

वायकर यांच्यामागे सलग काही महिने ईडीची सुनावणी सुरू होती. अनेक वेळा त्यांचा ईडीने तपास केला आहे. वायकर यांनी या चौकशीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पण लगेच काही दिवसांनी वायकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे वायकर यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळामध्ये सर्वांनाच धक्का बसला आहे.

News Title – Eknath Shinde Shivsena Joined Ashma padvi

महत्त्वाच्या बातम्या

“काँग्रेस नसती तर मोदी, शहा, फडणवीस ब्रिटीशांचे गुलाम असते”

“मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो”

मोठी बातमी! निवडणुकीसाठी उमेदवाराला ‘इतके’ लाख रूपये खर्च करता येणार

‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांना लागली लॉटरी; डबल फायदा

कारमधून आले, पिस्तूल काढलं नंतर जे घडलं त्याने पुणे हादरलं!