मुंबई | काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचे केंद्रीय नेते आज मुंबईत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज संध्याकाळी शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेतून राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेला महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेआधी काल मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा अखेर ठरला
मुंबईत झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीचा (MahaVikas Aghadi) 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित झाल्याची माहिती समोर आलीये.
सांगलीची जागा ठाकरे गटाकडे जाणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्हीही आग्रही पाहायला मिळाले. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाकरे गट 23 जागांवर ठाम
ठाकरे गट 23 जागांवर ठाम होता. संजय राऊत यांनी वारंवार याबाबत भूमिका मांडली होती. पण आता ठाकरे गटाला 22 जागा देण्याचा निर्णय बैठकीत झालाय. विशेष म्हणजे आपल्याकडे असलेल्या जागांपैकी हातकणंगले जागेवर ठाकरे गट राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. शिवसेनेचे ते पुरस्कृत उमेदवार असतील, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीने वंचितला 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. हा प्रस्ताव अजूनही कायम आहे. मविआ आता वंचितची दोन ते तीन दिवस वाट पाहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
“काँग्रेस नसती तर मोदी, शहा, फडणवीस ब्रिटीशांचे गुलाम असते”
“मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो”
मोठी बातमी! निवडणुकीसाठी उमेदवाराला ‘इतके’ लाख रूपये खर्च करता येणार
‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांना लागली लॉटरी; डबल फायदा