अखेर ठरलं! सांगलीची जागा शिवसेनेकडेच, ‘हा’ नेता लढणार निवडणूक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sangli Loksabha Election | लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता समोर आल्या आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये (Sangli Loksabha Election) अनेक दिवसांपासून निवडणूक कोण लढणार? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. सांगली मतदारसंघातून (Sangli Loksabha Election) काही दिवसांआधी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सांगली लोकसभेतून निवडणूक लढवणार आहे.

सांगली मतदारसंघाचा (Sangli Loksabha Election) अनेक दिवसांपासून प्रश्न सुटत नव्हता. सांगली येथून नेमकं कोणाला संधी द्यायची याबाबत संभ्रम होता. सांगलीच्या जागेवरून अनेकदा बैठक झाली होती. या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेमधील उमेदवार देण्याबाबत चर्चा होत होती. दोन्ही पक्षांमध्ये बैठक घेतली आणि सांगलीची जागा चंद्रहार पाटील यांना म्हणजेच शिवसेना ठाकरे गटाला देण्याबाबत निर्णय घेतला. (Sangli Loksabha Election)

सांगलीचा तिढा सुटला

सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत होती. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन्ही पक्ष सांगली लोकसभेच्या जागेवर दावा करत होते. मात्र महाविकास आघाडीने बैठक घेत सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ही जागा ठाकरे गटाच्या बाजून लागली आहे.

चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

चंद्रहार पाटील यांच्या नावाचा सांगली लोकसभेच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काही दिवसांआधी चंद्रहार पाटील हे मातोश्रीवर जात त्यांनी उद्धव ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केला. ते काही दिवसांपासून आपल्या सांगलीमध्ये जात नागरिकांच्या भेटीगाठी घेताना दिसतायत. उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील यांच्यासाठी सांगलीमध्ये सभा घेणार आहेत.

सांगली आणि रामटेक लोकसभा मतदारसंघावर पेच

सांगली आणि रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये पेच पाहायला मिळत होता. सांगली मतदारसंघातील पेच सुटला आहे. चंद्रहार पाटील यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघात पेच कायम असलेला पाहायला मिळतो.

रामटेक येथील जागेसाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. याठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये पेच कायम असलेला पाहायला मिळतो. रामटेकची जागा लढवण्यासाठी काँग्रेस देखील इच्छुक आहे. यामुळे रामटेक मतदारसंघामध्ये पेच कायम आहे.

News Title – Sangli Loksabha Election News Update

महत्वाच्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

“काँग्रेस नसती तर मोदी, शहा, फडणवीस ब्रिटीशांचे गुलाम असते”

“मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो”

मोठी बातमी! निवडणुकीसाठी उमेदवाराला ‘इतके’ लाख रूपये खर्च करता येणार