मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Balaji Kalyankar | आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख आता समोर आली आहे. सर्वांनी लोकसभेसाठी जोर लावला आहे. जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये गुंता होता. आता तो गुंता सुटला आहे. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशा राज्याच्या राजकारणामध्ये काही न् काही घटना घडताना दिसत आहे. नांदेडमधून एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) हे नांदेड उत्तर मतदरासंघाचे आमदार आहेत. अज्ञातांकडून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस काय करतील हे पाहणं गरजेचं आहे. या हल्ल्यामध्ये कल्याणकर (Balaji Kalyankar) यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. गाडीच्या मागील काच पूर्णपणे तुटली आहे. कल्याणकर गाडीत नव्हते तेव्हा हा हल्ला झाला असून ते बचावले आहेत. या हल्ल्यामुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

अज्ञातांकडून गाडीवर हल्ला

बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांच्या अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे ही घटना घडली आहे. पार्किंग परिसरामध्ये गाडी उभी करण्यात आली असून काही अज्ञातांनी गाडीवर हल्ला केला आहे. एका लग्नकार्यासाठी आमदार गेले होते, तेव्हा हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

हल्लेखोर कोण?

बालाजी कल्याणकर यांच्या गाडीवर केलेला हल्लेखोर कोण आहे. याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही. आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. तारखा देखील समोर आल्या आहेत, अशा स्थितीमध्ये नेमका हल्ला झाला कसा? याबाबत चर्चांना उधाण आलं असून तर्क-वितर्क लावले जात आहेत.

शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहे. अनेक आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत. तर काही आमदार हे ठाकरे यांच्याकडे आहेत. तसेच काही नेते ठाकरे यांना सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. म्हणून यापार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर झालेला हल्ल्याचा राजकीय पातळीवर काही संबंध आहे का? हे पाहणं गरजेचं आहे.

याआधी देखील शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. राजेश टोपे यांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यांची देखील गाडी पार्क करण्यात आली होती, त्यावेळीच त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

News Title – Balaji Kalyankar Four Wheeler On Attacked

महत्त्वाच्या बातम्या

अखेर ठरलं! सांगलीची जागा शिवसेनेकडेच, ‘हा’ नेता लढणार निवडणूक

सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

“काँग्रेस नसती तर मोदी, शहा, फडणवीस ब्रिटीशांचे गुलाम असते”

“मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो”