“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता समोर आल्या आहेत. अशातच अनेक महिन्यांपासून देशभर काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा सफल झाली आहे. सध्या मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर भारत जोडो यात्रेचा समारोप सुरू आहे. देशातील इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. लोकसभेचं बिगूल वाजलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सभेला संबोधित करत असताना “सोबत कोण असो वा नसो लढलं पाहिजे”, असं वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन केलं. इंडिया आघाडीच्या सभेमध्ये इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळतेय. तेजस्वी यादव यांच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोदी सरकारवर हल्ला केला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“काही कंपन्या आहेत त्यांचं उत्पन्न 200 कोटी आहे आणि इलेक्ट्रिकल बॉन्ड हे हजार कोटी रूपये आहे. मी देशातील परिस्थिती सांगत आहे. बंगालमधील परिस्थिती ही वेगळी आहे. महाराष्ट्रात एकत्र लढण्याचे प्रयत्न आहे पण दोन गोष्टी आहेत”. त्यानंतर बोलत असताना त्यांनी अमित शहा यांच्यावरही टीका केली आहे.

“प्रत्येक चॅनेलवर अमित शहा यांची प्रतिक्रिया आहे. आम्ही काळा पैसा पळवून लावला, असं अमित शहा म्हणत होते, असं प्रकाश आंबेडकर यांनी अमित शहांवर टीका केली. मोदींना तुम्ही इलेक्ट्रॉल बाँडवरून सवाल विचारणार की नाही. त्या कंपनीकडे 1300 कोटी रूपये आले कुठून? असा त्यांनी प्रश्न केला आहे. त्या कंपनीची ईडी चौकशी केली पाहिजे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

“त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मोदी हे सतत देशाला परिवार म्हणतात. त्यांच्या भाषणामध्ये देश हा आपला परिवार आहे. पण त्यांच्या खऱ्या कुटुंबातील एक महिला त्यांच्यासोबत राहत नाही”, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर मिश्किल टीका केली आहे, त्यानंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही”, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर हल्ला चढवला.

“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत राहिलं पाहिजे”

“हिंदु कुटुंबातील नातं हे गहन असतं. मोदींनी ते नातं निभवलं पाहिजे. मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत राहिलं पाहिजे. खर्गे जेव्हा बोलतील त्यावर ते बोलतील. मोदी हिंदु संस्कृतीबद्दल अनेकदा बोलले आहेत पण ते संस्कृ्ती अंमलात आणत नाहीत. ते जर संस्कृती पाळत नसेल तर आपण त्यांना समजावलं पाहिजे”, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला.

News Title – Prakash Ambedkar advise to modi

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

बाळासाहेब ठाकरेंना राहुल गांधींकडून पहिल्यांदाच अभिवादन!

भाजपची मोठी खेळी; सोलापुरातून मोठी बातमी समोर

अखेर ठरलं! सांगलीची जागा शिवसेनेकडेच, ‘हा’ नेता लढणार निवडणूक

सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला