“प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते..”, सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपचा हात धरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आता दोन गट पडले आहेत. अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप असं महायुतीचं सरकार आता महाराष्ट्रात सत्तेत आहे. शरद पवारांशी विभक्त झाल्यापासून दोन्ही अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून एकमेकांवर निशाणा साधला जातो.

अशातच अजित पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे. श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्याने अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी घेतलेली भूमिका आपणास पटली नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही, ही गोष्ट वेदना देणारी असल्याचं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे.

श्रीनिवास पवार यांची अजित पवारांवर टीका

श्रीनिवास पवार हे अजित पवार (Ajit Pawar) यांचे मोठे बंधू असून ते उद्योजक तथा कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. ते राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र, पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते दिसून आले आहेत.

प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय. अजित दादा (अजित पवार) आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का?, असं श्रीनिवास पवार म्हणालेत.

शरद पवारांमुळेच यांना सर्व पदं मिळाली आहेत. आता त्यांना म्हणायचं घरी बसा, किर्तन करा हे काही मला पटलं नाही. आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते, तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं नाही, असं श्रीनिवास पवार म्हणाले आहेत.

“भाजपला शरद पवारांना संपवायचंय”

पुढे त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. पवार नाव संपवायचं, ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चाल आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी त्यासाठी खूप प्रयत्न केला. आता त्यांनी घर फोडलं. साहेबांना एकुलती एक मुलगी आहे. या वयात त्यांना काय वाटत असणार? लक्षात ठेवा वय वाढलं म्हणून वयस्कर माणसांना तुम्ही कमजोर समजू नका. त्यांनी तुमच्यावर राज्य सोपवलं होतं. ते दिल्ली पाहत होते. परंतु तुम्ही वेगळेच काही केलं, अशी टीका श्रीनिवास पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केली आहे. राजकारणात आता श्रीनिवास पवार यांची चर्चा होऊ लागली आहे.

News Title-  Srinivas Pawar criticizes Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या –

RCB चॅम्पियन होताच ‘विराट’ सेलिब्रेशन; किंग कोहलीही थिरकला, स्मृतीचं ‘मानधन’ वाढलं!

“महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता भाजपमध्ये गेला पण माझ्या आईसमोर…”, राहुल गांधींनी उडवली खिल्ली

RCB अखेर चॅम्पियन! विजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव; 13 पुरस्कारांचे वाटप, वाचा सविस्तर

“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला

‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल