RCB चॅम्पियन होताच ‘विराट’ सेलिब्रेशन; किंग कोहलीही थिरकला, स्मृतीचं ‘मानधन’ वाढलं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | महिला प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला नमवून प्रथमच जेतेपद पटकावले. पुरूषांच्या संघालाही अद्याप ही कामगिरी करता आली नाही. स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील संघाने किताब जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुष क्रिकेट संघ फ्रँचायझीसाठी जे करू शकला नाही ते महिलांच्या संघाने केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट्सने पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले आणि या आनंदात विराट कोहलीही सामील झाला.

नुकताच इंग्लंडहून भारतात परतलेल्या विराट कोहलीने संघाची कर्णधार स्मृती मानधना हिच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे बोलून तिचे अभिनंदन केले. विराट कोहली बोलत असताना स्मृती मानधना खूप खूश होती. स्मृती चेहऱ्यावर स्मितहास्य करत बोलत होती तर दुसरीकडे चाहते स्टेडियममध्ये नाचत होते.

स्मृती मानधनाची RCB चॅम्पियन

खरं तर विराट कोहली दीर्घकाळ आरसीबीच्या पुरूष संघाचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 2016 मध्ये अंतिम फेरी गाठली. परंतु त्यावेळी डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. नंतर विराट कोहलीनेही संघाचे कर्णधारपद सोडले आणि सध्या फाफ डू प्लेसिस संघाचा कर्णधार आहे. मात्र, असे असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सर्वात मोठा चेहरा विराट कोहली आहे.

दरम्यान, स्मृती मानधनाच्या नेतृत्वात आरसीबीने किताब जिंकण्याची किमया साधली. ऐतिहासिक विजयानंतर आरसीबीच्या चाहत्यांसह खेळाडूंनी एकच जल्लोष केला. आरसीबीचा हा विजय खूप खास आहे. अनेकदा इतर संघांचे चाहते सोशल मीडियावर बंगळुरूची खिल्ली उडवतात कारण या संघात अनेक महान खेळाडू आहेत, मात्र आजपर्यंत एकही हंगाम जिंकता आलेला नाही.

 

Virat Kohli चा व्हिडीओ कॉल

महिला प्रीमिअर लीगमधील आरसीबीच्या विजयानंतर किंग कोहलीने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आरसीबीच्या शिलेदारांचे कौतुक केले. आता महिला संघ जिंकला आहे, ही फ्रँचायझीसाठी एक चांगली बातमी आहे. कारण यामुळे पुरुष संघालाही प्रेरणा मिळेल.

आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. आरसीबीला प्रथमच चॅम्पियन बनवण्यात फिरकीपटू सोफी मौलिनो आणि श्रेयांका पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीसाठी क्रिकेटमधील ही पहिलीच ट्रॉफी आहे, याआधी 2009, 2011 आणि 2016 मध्ये RCB च्या पुरूष संघाने अंतिम फेरी गाठली पण संघाला आयपीएल जिंकता आली नाही.

News Title- Virat Kohli celebrates through video call after RCB Women’s team wins Women’s Premier League 2024 title

महत्त्वाच्या बातम्या –

“महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता भाजपमध्ये गेला पण माझ्या आईसमोर…”, राहुल गांधींनी उडवली खिल्ली

RCB अखेर चॅम्पियन! विजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव; 13 पुरस्कारांचे वाटप, वाचा सविस्तर

“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला

‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला