Ashwin | अलीकडेच पार पडलेल्या कसोटी मालिकेत आर अश्विनने चमकदार कामगिरी केली. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत आर अश्विनने 500 बळी आणि 100 कसोटी सामने खेळण्याची किमया साधली. 500 बळी पूर्ण करणारा अश्विन कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील नववा खेळाडू ठरला आहे. कसोटी सामन्यात 500 बळींचा टप्पा पार करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने 5 सामन्यात 26 विकेट घेतल्या होत्या.
इंग्लंडविरूद्धच्या या संस्मरणीय आणि ऐतिहासिक कामगिरीबद्दल तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने अश्विनचा गौरव केला आहे. रविचंद्रन अश्विनला 1 कोटी रुपयांचा धनादेश देण्याबरोबरच तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने रविचंद्रन अश्विनला 100 सामने खेळून कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेण्याच्या कामगिरीबद्दल अनेक भेटवस्तूही दिल्या आहेत.
Ashwin चा भारी सत्कार
आर अश्विनला 500 विकेट्स पूर्ण केल्याबद्दल 500 सोन्याची नाणी, एक चांदीची ट्रॉफी, एक विशेष ब्लेझर (कोट) आणि 1 कोटी रुपये देण्यात आले आहेत. या सत्कार समारंभात रवी अश्विनची पत्नी आणि मुलेही त्याच्यासोबत मंचावर उपस्थित होती. अष्टपैलू खेळाडू म्हणून अश्विनने मागील काही काळापासून सर्वांना प्रभावित केले आहे.
या समारंभात अश्विनने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे मनापासून आभार मानले आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अश्विन म्हणाला की, मला माझ्या मनापासून एमएस धोनीचे आभार मानायचे आहेत. त्याने माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी त्याचा नेहमीच ऋणी राहीन. त्याने नेहमी मला नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी दिली. त्यामुळेच मी ख्रिस गेलविरूद्ध गोलंदाजी करू शकलो.
TNCA presented 500 Gold coins and a cheque of 1 Crore INR to Ravi Ashwin for completing 500 wickets in Test cricket. 1 Crore INR is 3.4 Crore PKR. WOW 🇮🇳🇵🇰🔥 #INDvsENG #IPL2024 pic.twitter.com/4VhRdb1C03
— Farid Khan (@_FaridKhan) March 18, 2024
भेटवस्तूंचाही वर्षाव
दरम्यान, आर अश्विनच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात 6 नोव्हेंबर 2011 रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याने झाली आणि काही दिवसांनीच त्याचे लग्न झाले. लग्नानंतर लेडी लकचा परिणाम असा की, अश्विन इतिहासातील सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज म्हणून उदयास आला.
अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 100 सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 516 विकेट्स आहेत. याशिवाय त्याने 116 एकदिवसीय सामन्यांमध्ये 156 विकेट्स आणि 65 ट्वेंटी-20 सामन्यांत 72 विकेट्स घेतल्या आहेत.
News Title- TNCA presented 500 Gold coins and a cheque of 1 Crore INR to Ravi Ashwin, read here details
महत्त्वाच्या बातम्या –
RCB चॅम्पियन होताच ‘विराट’ सेलिब्रेशन; किंग कोहलीही थिरकला, स्मृतीचं ‘मानधन’ वाढलं!
“महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता भाजपमध्ये गेला पण माझ्या आईसमोर…”, राहुल गांधींनी उडवली खिल्ली
RCB अखेर चॅम्पियन! विजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव; 13 पुरस्कारांचे वाटप, वाचा सविस्तर
“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला
‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल