“जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते”, भाजप आणि ठाकरे गटात जुंपली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | रविवारी इंडिया आघाडीची मुंबईतील शिवाजी पार्क येथे जाहीर सभा पार पडली. या सभेतून राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप झाला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो’, अशी न केल्याने सत्ताधारी भाजपने त्यांना लक्ष्य केले. हिंदुत्वाचा विसर पडला असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंवर करण्यात आली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची व्हिडीओ शेअर करत म्हटले की, आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते.

भाजप-ठाकरे गटात जुंपली

तसेच मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत? बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, अशा शब्दांत बावनकुळेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, खूपच वेगवान प्रतिक्रिया दिलीत, आमच्या सभेतूनच ट्विट केले का? असो, जे तुमच्या बॉसला अर्थात मोदींना 10 वर्षात जमले नाही ते काल गांधी यांनी केले. त्यांनी शिवाजी पार्कात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर हिंदुत्वाच्या धगधगत्या अग्निकुंडाला नमन केले. दहा वर्षात हे स्पष्ट झाले की तुम्हाला महाराष्ट्राची मते हवीत, विचार व्यापारीच हवा.

 

Uddhav Thackeray यांचे भाषण

इंडिया आघाडीच्या सभेला देशभरातील दिग्गज नेते या सभेसाठी मुंबईत उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी मुंबईत त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप करत भाजपवर टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरेंसह राज्यातील शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी भाषण केले. उद्धव ठाकरेंनी फोडाफोडीच्या राजकारणावरून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

News Title- BJP’s Chandrasekhar Bavanukale criticizes Uddhav Thackeray after speech at India Aghadi meeting, Ambadas Danve responds
महत्त्वाच्या बातम्या –

अश्विनचा ‘भारी’ सत्कार! 500 सोन्याची नाणी आणि 1 कोटी रुपये, भेटवस्तूंचाही वर्षाव

RCB चॅम्पियन होताच ‘विराट’ सेलिब्रेशन; किंग कोहलीही थिरकला, स्मृतीचं ‘मानधन’ वाढलं!

“महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता भाजपमध्ये गेला पण माझ्या आईसमोर…”, राहुल गांधींनी उडवली खिल्ली

RCB अखेर चॅम्पियन! विजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव; 13 पुरस्कारांचे वाटप, वाचा सविस्तर

“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला